महाराष्ट्र

गट-ड च्या ७९ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथे गट-ड (चतुर्थ श्रेणी) संवर्गातील विविध ७९ पदांच्या सरळसेवा भरतीची प्रक्रिया 20 ऑगस्टपासून ऑनलाइन सुरू करण्यात आली आहे. याबाबतची जाहिरात संस्थेच्या अधिकृत https://www.vdgmclatur.org/ प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांनी दिली आहे.

या पदांसाठीची भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्जाची लिंक विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूरच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांनी अधिष्ठाता कार्यालयातील कोणत्याही अधिकारी, कर्मचारी किंवा त्रयस्थ व्यक्तीसोबत कागदपत्रे अथवा आर्थिक व्यवहार करू नये. नियुक्ती मिळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक व्यवहार करणे किंवा बनावट नियुक्तीपत्र देणे अशा प्रकारची फसवणूक झाल्यास त्यास संस्था जबाबदार राहणार नाही. उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी केवळ अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. फसवणुकीची शक्यता वाटल्यास उमेदवारांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर गुन्हे विभागाशी संपर्क साधावा, असेही मोहिते यांनी सांगितले .
https://www.vdgmclatur.org/

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/