लातूर जिल्हा

राम तत्तापुरे यांचा सेवापुर्ती सोहळा 12 जुलैला अहमदपूरात

यशवंत विद्यालया चे पर्यवेक्षक राम दत्तपुरे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. सोबतच त्यांचे शैक्षणिक सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठे योगदान आहे त्या निमित्ताने त्यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सेवापूर्ती आणि कार्य गौरव सोहळा रविवार दिनांक 12 जुलै 2026 रोजी सकाळी दहा पंधरा वाजता प्रसाद मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्चा अध्यक्षस्थानी भक्ती स्थळाचे प्रमुख परमपूज्य आचार्य गुरुराज स्वामी महाराज, सदरच्या सत्कार महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाला प्रमुख अतिथी खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, शिक्षक आमदार विक्रम काळे, आमदार बसवराज पाटील, शिक्षण महर्षी डी बी लोहारे,शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे वरिष्ठ व्रत निवेदक विलास बडे प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी मंत्री विनायक पाटील भाजपाचे प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, माजी आमदार बब्रुवाहन खंदाडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशचे शिवानंद हेगणे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सांभ महाजन, नगराध्यक्ष एडवोकेट स्वप्निल व्हते, उप नगराध्यक्ष शेख अय्याज, टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर, उपाध्यक्ष डॉक्टर भालचंद्र पैके, सहसचिव डॉ. सुनिता चवळे, गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव तथा प्राचार्य रेखाताई हाके पाटील, टागोर शिक्षण समितीचे सदस्य अनिल मुळे बांधकाम व्यवसायिक सौ उर्मिलाताई बिराजदार, मुख्याध्यापक गजानन शिंदे यांच्या सन्मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्याला उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन यशवंत विद्यालय च्चा माजी विद्यार्थी संयोजन समितीचे प्रमुख तथा न्यज 18 मराठी चे वरिष्ठ वृत्त निवेदक विलास बडे यांच्यासह यशवंत परिवार आणि मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/