Special Story

अंतर्बाह्य दबावात इराणची वाटचाल कोणत्या दिशेने

इराणवरील आक्रमणाने इराकी लोकांनी अमेरिकेचे आभार माणून मोठा जल्लोश केल्याचे चित्र काल अनेक दूरचित्रवाणीवरून प्रसारीत झाले होते. सामान्यांबरोबरच पत्रकार देखिल त्यात होते. याचा अर्थ असा होवू शकतो की इराणस्थित गुप्त माहिती अमेरिका आणि इस्त्रायलला मिळत होती; त्याच माहितीच्या जारोवर अमेरिका आणि इस्त्रायलने पहिल्या तासाभरातच इराणच्या खोमनेई यांचा खात्मा करुन प्रत्यक्षात अर्धे काम केले. अमेरिका इराण यांच्यातील युद्धाला जशी आंतरराष्ट्रीय राजकारण, तेलाचा व्यापार आणि अण्वस्त्रेही कारणीभूत आहेत तशी इराणमधील परिस्थिती देखिल कांही अंशी कारणीभूत ठरली काय याचाही विचार होणे अपेक्षित आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी टकराला थेट इराणमधील लोकांचा असंतोष हे एकमेव कारण नाही, पण मागच्या तीनेक वर्षापासून इराणच्या आंतर्गत मोठी नाराजी, कणा मोडलेली अर्थव्यवस्थेची अवस्था आणि आयतुल्ला खामेनेई यांच्या दीर्घकालीन नेतृत्वाविरुद्ध वाढत असलेला जनसामान्यातील राग ही देखिल एक महत्त्वाची पार्श्वभूमी मानली जात आहे.
इराणमधील परिस्थितीचा परिणाम
– इराणवरील अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे (oil, finance, technology) अर्थव्यवस्था खूप दबावात होती, त्यामुळे गरिबी, वाढत्या किमती आणि बेरोजगारी लोकांमध्ये नाराजी निर्माण करत आहेत. – २०१९, २०२२, २०२५ आणि २०२६ मध्ये झालेल्या इंधन किमती वाढ, महिलांच्या अधिकारांवर लावण्यात आलेले अंकूश आणि दोलमान स्थितीतील अर्थव्यवस्थेच्या पतनामुळे मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली आहेत; यात तरुणांचा आणि मध्यमवर्गाचा सहभाग खूप मोठा होता. या आंदोलनांवर खामेनेईच्या सुरक्षा दलांनी कठोर कारवाई केली, यात काही हजार आदोंलकांना ठार मारण्यात आले आहे.आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थेच्या आकडेवारीनुसार केमान 20000 लोक आदोंलनादरम्यान मारले गेले असण्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. मात्र कोणतेही ठोस कारवाही कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघटनेकडून करण्यात आली नाही.(याची खरी आकडेवारी अद्याप बाहेरअआली नाही), हजारो तरुणांना अटक आणि दडपशाहीने आदोंलने शांत करण्याचा प्रयत्न झाला, याच दरम्यान खमेनेई यांच्या महिलाविषय कठोर निर्बधांना झुगारुन 3 नोव्हेबंर 2024 रोजी इरणी रस्त्यावर आहू दरयाई या विद्यार्थींनीने हिजाब नीट न घातल्यामुळे पोलिसांनी केलेल्या अवमानकारक वर्तनाचा निषेध करत केवळ अंर्तवस्त्रावर फिरुन तिने आपला निषेध नोदंवत महिलांच्या अधिकारांची मागणी केली. ही बाब देखिल महिलांना स्वांतत्र्यांच्या विचाराने प्ररित करणारी ठरली पुढे त्याचे रुपांतर मोठ्या आदोलंनात झाले. त्यामुळे लोकांमध्ये खामेनेई यांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध आणि खामेनेईंविरुद्ध इराणी जनतेतील अविश्वास वाढला गेला होता .

खामनेई यांच्या जाचाला इराणी लोकांचा असंतोष ,त्यांच्या राजकीय विचारधारा, देशाच्या कट्टर धार्मिक विचारावर आधारित राज्याची रचना, परराष्ट् नीती आणि आंतरिक दडपशाही यांच्याविरुद्ध आहे. तरुण पिढी आणि शहरी मध्यमवर्ग यांना अधिक उदार राजकीय वातावरण, आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे शिथिलीकरण आणि आर्थिक सुधारणा हव्या आहेत, तर खामेनेई आणि त्यांच्या जवळच्या गटांनी प्रतिकाराची राजकीय विचारधारा (resistance economy, confrontation with US/Israel) चालू ठेवली आहे. परिणामी ही टकर आणि युद्धाच्या संभावनेमुळे एक काळ इराणी लोकांमध्ये राष्ट्रवादी एकता दिसली होती, पण त्यानंतर आर्थिक आणि मानवी नुकसानीमुळे पुन्हा अंतर्गत दबाव वाढला आहे.
युद्धाचे कारण म्हणजे काय?
– अमेरिका–इराण १९५३ च्या सीआयए द्वारे होणाऱ्या कूप, १९७९ च्या क्रांती, १९७९–८१ च्या राजदूतांच्या संकटापासून आजपर्यंतच्या गुंतागुंतीत वाढत गेलेल्या तणावाचा भाग आहे, फक्त खामेनेई किंवा फक्त आंतरिक कंटाळा यामुळे युद्ध सुरू झालेले नाही. मात्र इराणमधील नाराजी, अर्थव्यवस्थेची अडचण आणि खामेनेईंच्या नेतृत्वाविरुद्धचा अविश्वास यामुळे राज्याच्या आंतरिक स्थिरतेला धोका निर्माण झाला होता , आणि त्यामुळे बाहेरच्या शत्रूंशी टक्कर घेण्याचा “राष्ट्रवादी नारा” राजकीय नेतेही वापरत आले; त्यातून युद्धाची शक्यता आणखी वाढते. थोडक्यात खामेनेईंच्या दीर्घ नेतृत्वामुळे आणि देशाच्या बंदिस्त, संघर्षपूर्ण धोरणामुळे इराणी लोक खूप कंटाळले आहेत हे खरे आहे, पण तोच थेट युद्ध घडवणारा कारण नाही; तो फक्त एक वाढता दबाव आहे जो युद्ध घडून येण्यास मदत केल्याचे दिसून येते.

खामेनेई इराणमध्ये सत्तेत येण्यापूर्वी (१९७९ च्या क्रांतीपूर्वी) तेथे पाहलवी राजवट असताना राजकीय व सामाजिक व्यवस्था अधिक आधुनिक होती. ती युरोपीय शैलीची होती मुक्त विचारधारेची आणि महिलांना तुलनेने जास्त कायदेशीर व सामाजिक अधिकार प्रादान करणारी होती . खामेनेईपूर्व इराणची व्यवस्था१९२५ ते १९७९ दरम्यान पाहलवी राजघराण्याच्या काळात (विशेषतः रेझा शहा आणि त्याच्या मुलाच्या काळात) शिक्षण, नोकरी, शहरी जीवन आणि धार्मिक नियमांवर अधिक लोकांना खुला दृष्टिकोन बहाल केलेला होता. सरकारने देशाचे “आधुनिक, युरोपीय तत्त्वांच्या आधारे” राष्ट्र बनवण्याचा ध्यास घेतला होता, त्यामुळे कायदेशीर सामाजिक सुधारणा, शिक्षण आणि प्रशासनात महिलांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न झाला. १९२८ नंतर इराणी महिलांना परदेशात शिक्षण घेण्यास मदत, १९३६ मध्ये तेहरान विद्यापीठात महिलांना प्रवेश, १९४४ मध्ये मुलींचे शिक्षण अनिवार्य करण्यात आले. शहरी भागांत मुली–मुलांना समान शिक्षण देण्याचा प्रयत्न केला गेला . राजकारणात आणि नागरी अधिकारात १९६३ मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला; त्या संसदेत जावू शकत होत्या ; त्यांच्यासाठी विशेष नोकरीच्या संधी आणि वकील अशा क्षेत्रातील संधी खुल्या करण्यात आल्या.
१९७५ च्या Family Protection Law ने महिलांना घटस्फोटासाठी चांगले जागरूक अधिकार दिले होते, मुलांच्या संगोपनाचा अधिकार वाढवला, बहुविवाह मर्यादा आणल्या गेल्या, आणि लग्नाच्या वयात वाढ करण्यात आली. तंत्रनिष्ठ कायदे सुधारले, लिंगभेद टाळण्याचा प्रयत्न केला, “समान वेतनासाठी समान काम” या तत्त्वांचा अंतर्भाव झाला; महिला शिक्षिका, आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्त्या, वकील इ. भूमिकांत महिला काम करू शकत होत्या . रेझा शहाच्या काळात (१९३० च्या दशकात) काशफ‑ए हिजाब अर्थात् (veilचे निर्बंध) लागू करण्यात आला; खुल्या तोंडाने बाहेर पडताना बुरखा/हिजाब न वापरणे हा नियम अनेक पारंपारिक महिलांना अस्वस्थ वाटला, त्या घरातच राहिल्या; तर शहरी, उच्च वर्गातील महिलांना उघडपणा आणि सार्वजनिक जीवनात भाग घेण्याची संधी मिळाली. व्यक्ती स्वांतत्र्य मोठ्या प्रमाणात होते ते १९७९ नंतर खामेनेई यांच्या मुस्लिम‑कौटुंबिक राजकीय विचारधारा अंमलात आल्यानंतर हिजाब बंधनकारक करण्यात आला, कुटुंब कायदे आधीच्या पेक्षा कमी लवचिक, महिलांना न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करण्यास बंदी आणि त्यांच्या भूमिका जास्तीत जास्त हाउस वाईफ पुरती मर्यादीत करण्यात आली, खामेनेईपूर्वी इराणमधील महिला अधिक हक्क गाजवणाऱ्या , शिक्षण‑राजकारण‑कामाच्या दृष्टीने त्या पुढारलेल्या व्यवस्थेत होत्या, आणि १९७९ च्या क्रांतीनंतर या अधिकारांत मोठी मर्यादा आणि मागासलेपणा आला, त्यात खामेनेईंच्या विचारधारेचा मोठा ठसा आहे.
खामेनेई यांच्या नंतरचा इराण कसा असेल
खामेनेईंनंतर इराण कसा असेल हे अद्याप स्पष्ट सांमणे तसे कठीण असले तरी, वर्तमान परिस्थिती, आंतर्गत तणाव आणि जागतिक दबाव यांवरून काही संभाव्य दिशा सांगता येतील. फक्त धार्मिक राज्य पुन्हा जपणे असेल किंवा आंतर्गत बदल/संस्कारांचा दबाव वाढून तीव्र अस्थिरता, आंदोलने किंवा व्यवस्थेचा कायमस्वरूपी बदल या शक्यता आहेत.

१. इराणसाठी आत्ता चर्चेत असलेली नावे (उदा. आयतुल्लाह अराफी, मोजतबा खामेनेई, IRGC‑जवळचे कट्टरपंथी नेते) ही बहुतेक शक्य उत्तराधिकारी धार्मिक‑राजकीय वारसाच पुढे चालवतील, त्यामुळे “सर्वोच्च नेता + IRGC + धार्मिक नेतृत्व” या त्रिकोणातील ताण‑तणव अधिक जास्त असेल.
– अमेरिकन आणि इस्रायली विश्लेषकांच्या मते, खामेनेई मारले गेल्यानंतर नव्या लीडरच्या रूपात आणखी कडक कट्टरपंथी, IRGC‑मुख्य (सैन्य‑गुप्तचर भाग) नेतेही सत्तेत येऊ शकतात, ज्यामुळे बाहेरच्या शत्रूंशी टक्कर घेणे आणि आंतर्गत दडपशाही दोन्ही वाढू शकते.
२. खामेनेई यांच्या सत्तेदरम्यानच इराणमध्ये वारंवार आंदोलने झाली (महिला‑अधिकार, आर्थिक नाराजी, युद्ध‑विरोधी आंदोलने); त्यांच्या नंतर नव्या लीडरला देखील त्याच तीव्र आंदोलनांचा सामना करावा लागू शकतो. जर नवा नेता खूपच कडक असेल आणि महिलांच्या अधिकारांवर आणखी नियंत्रण ठेवेल, तर महिलांच्या स्वातंत्र्यावरुन आंदोलनांचा तीव्र राजकीय प्रश्न निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे राज्याच्या स्थिरतेवर दडपण येईल.

३. युद्ध, आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि आंतरिक दबाव यांमुळे इराणची अर्थव्यवस्था आधीपासूनच संकटात आहे; अशावेळी खामेनेई नंतरचा जो नेता सत्तेत येईल तो जर युद्धावर भर देत राहिला तर त्याचा फटका सामान्य पातळीवर जास्त पडेल, वाढलेल्या गरिबी, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारामुळे लोकांचा असंतोष आणखी तीव्र होऊ शकतो. दुसरीकडे, जर त्याच्या जागी जो आंतरराष्ट्रीय निर्बंध कमी करण्यासाठी चर्चा करेल आणि सुधारणांनाचा पुरस्कार करेल, तर इराण फक्त धार्मिक बंदिस्त राज्यापेक्षा थोडा अधिक लवचिक राजकीय‑आर्थिक सुधारणा घडून येवू शकतात. मात्र त्याला आत्ताच्या कट्टरपंथी गटांशी टक्क्र घ्यावी लागेल.

४. अमेरिका‑इस्रायल यांना खामेनेईच्या नंतरच्या इराणावर विशेष लक्ष ठेवायचे आहे. त्यांच्या गुप्तचर आणि राजनैतिक विश्लेषणांनुसार, नवा लीडर अधिक आक्रमक असल्यास इराण‑पॅसिफिक देशांमध्ये तणाव आणखी वाढू शकतो .तर दुसरीकडे, युरोप, चीन, रशिया इ. शक्य आहे की इराणच्या नव्या नेतृत्वाकडून त्यांना अधिक व्यावहारिक चर्चा आणि युद्धपूर्व धोरणांचा त्याग करण्याची अपेक्षा असेल; पण हे सर्वस्वी अवलंबून असेल की नवा नेता अंतर्गत कट्टरपंथी गटांना कशा प्रकारे नियंत्रणात ठेवू शकतो .
५. जर खामेनेईपश्चात नवा लीडर त्याच्या धार्मिक‑राजकीय व्यवस्थेचा च “वारसा घेत राहिला तर इराण अधिक अस्थिर, लोकप्रिय आंदोलने आणि सैन्य‑धार्मिक नियंत्रणाखालील राज्य असेल, जर नवीन नेता आंतरिक दबावांपुढे उभा राहून काही सुधारणा आणि चर्चेला तयार असेल तर इराण अधिक लवचिक, कायदेशीर आणि आर्थिकदृष्ट्या थोडा स्थिर असेल; पण यात कोणतेही एक निश्चित भविष्य नाही; ते अवलंबून असेल आंतर्गत ताण तणाव, महिला‑तरुणांच्या आंदोलनांच्या तीव्रतेवर आणि नव्या सुप्रीम नेतृत्वावर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/