मराठवाडा

साने गुरुजी जयंती निमित्त विभागीय कथाकथन स्पर्धा

पूज्य साने गुरुजी जयंतीनिमित्त कथामाला हेलस आणि जालना येथील मानस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडास्तरीय विभागीय कथाकथन स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे.

स्व.दत्तात्रय हेलसकर यांनी १९९४ मध्ये स्थापन केलेल्या अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस ता.मंठा जि.जालना च्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा या दृष्टीने संस्कारक्षम, शैक्षणिक, सामाजिक, विधायक उपक्रम राबविले जातात.

स्पर्धेचे हे सहावे वर्ष असून
आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभागी करावे.
स्पर्धेचे स्वरूप, नियम व अटी प्
प्रवेश मोफत असून स्पर्धा मराठवाड्यातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आहे.
स्पर्धा दोन गटात आहे.
1) बालगट : इयत्ता पाचवी ते सातवी
2) किशोर गट : इयत्ता आठवी ते दहावी
कथाकथनासाठी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील संस्कारक्षम, बोधप्रद कथेची निवड करणे आवश्यक आहे.
कथा बाल गटासाठी पाच ते सात मिनिटांची वेळ व किशोर गटासाठी आठ ते दहा मिनिटांची वेळ राहील.
पारितोषिके व सन्मान
जिल्हास्तरा वर प्रथम , व्दितीय व तृतीय येणाऱ्या स्पर्धकास सन्मानपत्र व ग्रंथ भेट
विभागीय स्तर प्रथम पारितोषिक बालगट व किशोर या दोन्ही गटातील विभागस्तरीय विजेत्यांना रोख पारितोषिके, सन्मान प्रमाणपत्र देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येईल.
विभागीय स्तरावर सर्वप्रथम येणाऱ्या प्रथम : रोख दीड हजार रुपये
विभागीय स्तरावर द्वितीय येणाऱ्यास : रोख एक हजार रुपये
तृतीय येणाऱ्यास पाचशे रुपये रोख देण्यात येणार आहेत.
सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभाग नोंदणीची अंतिम तारीख : *दि.२० डिसेंबर २०२५, शनिवार असून जिल्हास्तरीय स्पर्धा दिनांक :*
२४ डिसेंबर २०२५, बुधवार रोजी होणार आहेत.
विभागीय स्तरावरीलय स्पर्धा दिनांक :
१० जानेवारी २०२६, शनिवार रोजी होणार आहेत.
या स्पर्धेत दोन्ही गटातील कथाकथन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन संयोजन समितीच्या प्रमुख श्रीमती कल्पनाताई दत्तात्रेय हेलसकर, लातूर जिल्हा संयोजक राम तत्तापुरे, सहसंयोजक श्रीमती संगीता आबंदे पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/