देश -विदेश

रीलच्या नादात जीव गमावला

सोशल मीडिया आमच्यासाठी उपकारक ठरत आहे की अपकारक याविषयी भिन्न मते असू शकतात. मात्र जे जे याचा अतीरेकी वापर करतात किंवा याच्या आहारी जातात त्यांच्यासाठी सोशल मीडिया शाप ठरत आहे.अशाच एका घटनेत एका अल्पवयीन मुलाच्या जीववार बेतली आहे.एैन दिवाळीच्या दिवशी त्यांने सोशल मीडियासाठी रील तयाार करण्याच्या नादात आपला जीव गमावला आहे.

पुरी सदरमधील चंदनपूर पोलिस हद्दीतील जानकादेईपूर स्टेशनवरील रेल्वे फाटकावर सोशल मीडियासाठी रील शूट करण्याचा प्रयत्न करत असताना चालत्या रेलेवेला धडकून पुरी येथील एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या घटनेदरम्यान रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मृत व्यक्तीचे नाव विश्वजीत साहू (१५) असे आहे. स्थानिक रहिवाशांनी त्याला पुरी जिल्हा मुख्यालय रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी उपचारादरम्यान मृत घोषित केले.
सूत्रांनुसार, विश्वजीत आणि त्याचे मित्र दक्षिणा काली मंदिराचे दर्शन घेण्यासाठी सखी गोपालच्या बिरगबिंदापूर येथे गेले होते. मंदीरातून परतततांना त्यांनी बिरप्रतापपूर येथील कामरूपा मंदिराचे दर्शन घेतले आणि नंतर जनकदेईपूर रेल्वे स्थानकाजवळ विश्वजीत रेल्वे ट्रॅकजवळ उभा राहून व्हिडिओ रील शूट करत होता, तर त्याच्या मित्रांनी दूरवरून क्लिप शूट करत हाेता.धावत्या रेल्वेचा जोराचा धक्का लागल्याने त्याला जबर मार लागला होता.

भारतात अलीकडच्या काळात “सेल्फी मृत्यू” सर्वाधिक नोंदवले जात आहेत. २०१८ च्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की ऑक्टोबर २०११ ते नोव्हेंबर २०१७ दरम्यान भारतात सेल्फी मृत्यूच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. हा अभ्यास केवळ “रील्स” बद्दल नसला तरी, धोकादायक वर्तना सारखेच आहे.

अलीकडे असे प्रकर वारंवार घडत असून सोशल मीडियासाठी धोकादायक स्टंट रील तयार करण्याच्या प्रयत्नात मृत्यू झालेले आहेत, ज्यात
कडा किंवा धबधब्यावरून पडणे,
रुळांवर चित्रीकरण करताना ट्रेनने धडकणे,
हाय-स्पीड वाहन स्टंट करणे
बंदुक किंवा विजेचा धक्का बसल्याने होणारे अपघात आदी.
यासंदर्भात जानेवारी २०१६ मध्ये वॉशिंग्टन पोस्टने बातमी दिली होते की २०१५ मध्ये झालेल्या किमान जगात २७ “सेल्फीशी संबंधित मृत्यूंपैकी सुमारे निम्मे मृत्यू भारतात झाले होते.
यावरुन अापण सेल्फी च्या नादात जीव गमावताे अाहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/