महाराष्ट्र

श्री क्षेत्र कांरजा लाड ते श्री क्षेत्र गाणगापूर पालखी रथयात्रेचे आयोजन

श्री क्षेत्र कांरजा लाड ते श्री क्षेत्र गाणगापूर पालखी रथयात्रा दिंनाक 26 ऑक्टेाबर 2025 पासून सुरू होत आहे. ही रथयात्रा श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या आज्ञेनुसार काढली जात आहे. त्यांच्याच आज्ञेनुसार गुरुतत्व प्रदीप परीवाराच्या वतीने याअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत श्रीगुरुचरित्र सारात्मृत ग्रंथाच्या 1008 पारायणची मालीका सुरु असून त्यातील नववे पारायण श्री क्षेत्र गाणगापूर येथे 25 डिसेंबर ते 2 जानेवारी 2026 दरम्यान संपन्न होणार आहे. यासाठी “लक्ष भोजन सहितम्,सिद्धग्रंथ १००८ श्री गुरुचरित्र सारामृत पारायण, श्री गुरुचरित्र कथामृत व नाम भक्ती सोहळा” आयोजित केला आहे.
या यात्रेच्याद्वारे श्री स्वामी महाराजांचे दर्शन, अभिषेक, पूजन, आरती व भिक्षा इत्यादी सेवा करून श्रीस्वामी महाराजांचे कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा जणू काही हा अमृत सिद्धी योग प्राप्त झाला आहे या पालखी रथयात्रेच्या मार्गातील विविध शहरे व विविध गावातील श्री स्वामी महाराजांचे भक्त या पालखी रथयात्रेच्या आगत- स्वागत व दर्शन इत्यादी कार्याकरिता कार्यमग्न झालेले असून या मार्गातील प्रत्येक भाविक भक्तांनी या स्वामी कार्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने आपल्या परिसरातील जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत ही माहिती पोहोचवून या ईश्वरीय कार्यात आपला बहुमोलाचा वाटा उचलून श्री स्वामी कृपेस पात्र व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
यात्रा मार्ग पुढील प्रमाणे असेल.
अ.क्र दिनांक,वार गावे माध्यान्ह विश्राम किमी मुक्काम
१ २६/१०/२५ रविवार कारंजा, मूर्तीजापुर, अकोला, शेगाव,खामगाव मूर्तीजापुर खामगाव
२ २७/१०/२५ सोमवार खामगाव, नांदुरा, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव नांदुरा जळगाव
3 २८/१०/२५ मंगळवार जळगाव, अमळनेर, धुळे, मालेगाव, सटाणा अमळनेर सटाणा
४ २९/१०/२५ बुधवार सटाणा, देवळा, कळवण, वणी, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर कळवण ओझर
५ ३०/१०/२५ गुरुवार ओझर, त्र्यंबकेश्वर, नाशिक नाशिक नाशिक
६ ३१/१०/२५ शुक्रवार पिंपळगाव (बसवंत), लासलगाव, विचुर, येवला, कोपरगाव येवला वैजापुर
7 १/११/२५ शनिवार गंगापूर, दत्त देवगड, नेवासा, पैठण- बीडकिन नेवासा छ.संभाजी नगर
8 २/११/२५ रविवार छ.संभाजीनगर, करमाड, बदनापूर छ. संभाजीनगर जालना
९ ०३/११/२५ सोमवार जालना, परतूर, सृष्टी, मंजरथ, माजलगाव,मानवत माजलगाव मानवत / पाथरी
१० ०४/११/२५ मंगळवार मानवत, सेलू, जिंतुर, सेनगाव, रिसोड, वाशिम १६४ जिंतुर रिसोड/ वाशिम
११ ०५/११/२५ बुधवार वाशिम,कन्हेरगाव नाका, हिंगोली, औंढा, परभणी औंढा कारेगाव – परभणी
१२ ०६/११/२५ गुरुवार परभणी, वसमत परभणी वसमत
१३ ०७/११/२५ शुक्रवाऱ़ वसमत, असेगाव, नांदेड, भोकर नांदेड भोकर
१४ ०८/११/२५शनिवार (चतुर्थी), भोकर, मुदखेड, गोरठा, पेठ उमरी,करखेली,धर्माबाद बासर
१५ ०९/११/२५ रविवार बासर,बिलोली, मुखेड, शि. ताजबन्द नाष्टा बासर जेवण – कासराळी उदगीर
१६ १०/११/२५ सोमवार उदगीर, लातूर, औसा, तुळजापूर नाष्टाव जेवण लातूर तुळजापूर
१७ ११/११/२५ मंगळवार तुळजापूर,धाराशिव, कळंब, परळी जेवण – धाराशिव जेवण आंबेजोगाई मुक्काम – परळी
१८ १२/११/२५बुधवार परळी, सोनपेठ,शिरसाळा, तेलगाव, बीड
१९ १३/११/२५ गुरुवार बीड, जामखेड,कर्जत,श्रीगोंदा, शेडगाव नाष्टा जेवण परळी बीड
२० १४/११/२५ शुक्रवार शेडगाव, श्रीगोंदा, अहिल्यानगर, सुपा, शि.,रांजणगाव,वाघोली पेडगाव वाघोली
२१ १५/११/२५ शनिवार पुणे – कसबा गणपती, दगडूशेठ गणपती-दत्त मंदीर, श्रीशंकर महाराज मठ,विणकर सभागृह, सारसबाग गणपती, वासुदेव निवास,म्हातोबा मंदीर नाष्टा- विणकर स. फराळ- म्हातोबा मंदिर धायरी कोथरूड,वारजे, शिवणे,नांदेड सिटी
२२ १६/११/२५ रविवार सुखीभवन चिंचवड, मोरया गोसावी मंदिर, निगडी, देह, मोशी चिंचवड शिरवळ
२३ १७/११/२५ सोमवार शिरवळ, सातारा, कराड,पलूस, औदुंबर सातारा जेवण व मुक्काम औदुंबर
२४ १८/११/२५ मंगळवार औदुंबर, आष्टा, पेठ वडगाव, कोल्हापूर, इचलकरंजी, शिरधोण नाष्टा औदुंबर जेवण -कोल्हापूर नरसोबावाडी
२५ १९/११/२५ बुधवार नरसोबावाडी, जयसिंगपुर, सांगली, मिरज, सांगोला जेवण -सांगली पंढरपूर
२६ २०/११/२५ गुरुवार पंढरपूर,मोहोळ,सोलापूर अक्कलकोट, गाणगापूर जेवण – सोलापूर गाणगापूर

पालखी रथयात्रा पत्रिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/