महाराष्ट्र

अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर

राज्यात अतिवृष्टीमुळे 68 लाख हेक्टर इतक्या जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. साधारणपणे जास्तीचं नुकसान 29 जिल्ह्यात झालं असून आपण 253 तालुके सरसकट नुकसानभरपाईसाठी घेतले आहेत. त्यामध्ये, 2 हजार 59 मंडळं असून येथे 65 मिमीची अट ठेवण्यात आली नाही. त्याठिकाणी सरसकट मदत करण्याचा निर्णय घेतला असून अतिवृष्टीग्रस्तांसाठी तब्बल 31 हजार 628 कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज मुख्यमंत्र्‍यांनी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

राज्यातील अतिवृ्ष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दसरा दिवाळी सणांच्या पाश्र्वभूमीवर सरकारकडून मदतीची अपेक्षा लागली होती. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे आजच शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा होणार असल्याची माहिती होती, दिवाळीपूर्वीच बळीराजाच्या खात्यावर मदतनिधी जमा होईल, असेही मुख्यमंत्र्‍यांनी यापूर्वी नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली होती. दिवाळी सणाला अवघे काही दिवस राहिल्याने आता राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांसाठी आज अखेर मदतीचं पॅकेज जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी मदत पॅकेजची घोषणा केली.अतिवृष्टीग्रस्तांसाठी तब्बल 31 हजार 628 कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे.

त्यानुसार, खरडून गेलेल्या जमिनीसाठी (रोख) =47000
खरडून गेलेल्या जमिनीसाठी (मनरेगा माध्यमातून=300000
एकूण (खरडून गेलेल्या जमिनीसाठी) =347000
हंगामी बागायती शेतीसाठी= 27000
बागायती शेतीसाठी =32500
रब्बी पीक घेता यावे यासाठी (प्रति हेक्टर) =10000
विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना (विमा व्यतिरिक्त)=17000
कोरडवाहू शेतीसाठी=35000
विमा उतरवलेल्या बागायती शेतीला=50000
विद्यार्थ्यांना शैक्षणिक परीक्षा फी माफी
रब्बी हंगामासाठी =१००००
घरांचे नुकसान झाले तर पीएम आवास योजनेंतर्गत मंजूर
दुकान गोठा आदींची नुकसान भरपाई म्हणून 50000
कोबंड्यासाठी =१००
पायाभूत सुविधांची उभारणीसाठी 15000 कोटी

या बरोबरच अन्य नुकसान भरपाईची तरदूत या घोषणेअंतर्गत करण्यात आली आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने मोठे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या समवेत आयोजित पत्रकार परिषदेत अतिवृष्टीग्रस्तांसाठी एकूण 31,628 रुपये कोटींचे पॅकेज जाहीर केले. शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी मदत जमा करण्याचा सरकारचा आग्रह असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील नांदेड, वाशिम, यवतमाळ, अकोला, सोलापूर, बुलडाणा, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड आणि नागपूर या जिल्ह्य़ातील 1 कोटी 43 लाख 52 हजार 141 हेक्टर क्षेत्रावर असलेल्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, यापैकी 29 तालुक्यांमध्ये सर्वाधिक फटका बसला आहे. नुकसान झाले आहे.
राज्य सरकारने घोषित केलेल्या हे पॅकेज म्हणजे, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली पाहिजे, हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करणे अपेक्षित होते असा आरोप विरोधी पक्ष नेते यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/