महाराष्ट्र

वीरशैव लिंगायत वधू वर परिचय मेळावा २६ ऑक्टोबरला

मोफत वीरशैव लिंगायत वधू वर परिचय मेळावा २६ ऑक्टोबर रोजी लातूर येथील खंडोबा गल्लीतील सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यात वधू-वरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने बसवराजअप्पा धाराशिवे यांनी केले आहे.

सदर मेळावा श्री राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे उत्तराधिकारी श्री गुरु १०८ राजेश्वर शिवाचार्य महाराज आणि श्री पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर चे सह अध्यक्ष आणि नाथ संस्थानचे महाराज हे. भ. प. श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत आयोजित केला जाणार आहे.
सदर मेळाव्याला कोणत्याही प्रकारचे शुल्क असणार नसून आपल्या जीवन साथीदाराची निवड करण्यासाठी या मेळाव्यात आपल्याला मुक्त संधी असेल. कोणत्याही प्रकारच्या एजंटाशिवाय आपण आपला जोडीदार निवडू शकणार आहात. या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी असे आवाहन संयोजकांच्या वतीने तम्मा चोंडे, नागेश कानडे, कार्याध्यक्ष राजाभाऊ हलकुडे, विश्वनाथराव चट्टे, स्वागताध्यक्ष दिलीप होनराव, पवनकुमार कल्याणी, कार्यवाहक बालाजी पिंपळे, बसवेश्वर हलकुडे, उपाध्यक्ष सुनील भिमपुरे, शिवराज बुरांडे, सचिव सतीश कानडे, प्रशांत बोळेगावे, ग्रामीण उपाध्यक्ष शांतिवीर मुळे, ओमप्रकाश गलबले, महेश कोल्हे, वैभव विभुते, विवेक जाणते, मल्लिकार्जुन पेद्दे, भालचंद्र दाणे, प्रभाकर कापसे, महादेव ओम प्रकाश झुरळे, गणेश कानडे, मन्मथ गोळेगावे, सुहास अष्टके, काशिनाथ जनगावे, सोमनाथ लुल्ले, गौरीशंकर आप्पा सांग काय आहे एडवोकेट पंकज कोरे आशिष स्वामी, मन्मथ चिखले, राजाभाऊ उपासे, शिवा रोडे, प्रसाद नागोरे, शिवकुमार महाजन यांच्यासह अन्य सदस्यांनी केले आहे.
नाव नोंदणीसाठी पुढील मोबाईल नंबर वापरा 9420872812, 9423735064, 997552 0781, 9402196844, 9096714444, 9673811777

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/