
आणीबाणीच्या काळातील लोकशाही मूल्याचे रक्षण करून मूल्याच्या रक्षण करण्यासाठी जेल भोगलेल्या लोकशाही रक्षकांचा आज सन्मान होणार आहे त्यात उदगीरचे माजी आमदार प्रा. मनोहर पटवारी यांच्यासह श्रीमती रेखा मनोहर हिबारे, श्रीधर नारायणराव काळदाते यांच्यासह जिल्ह्यातील 105 जणांचा सन्मान केला जाणार आहे.

त्यात मोरारजी देसाई आणि जेपी अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यांनी देशभर या आंदोलनाला अधिकच तीव्र बनवले होते. या आंदोलनात देशपातळीपासून ते गाव पातळीपर्यंत विरोध केला जाऊ लागला. अनेकांनी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या या निर्णयाला विरोध दर्शवला. त्याचे परिणाम म्हणून आंदोलकांना तुरुंगात डांबण्यात आले होते. विरोधकांना कारावास भोगाव लागला आहे.
राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली. राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद ह्यांनी संविधानातील कलम ३५२(१) खाली आणीबाणी जारी केली जी २५ जून १९७५ पासून लागू झाली. ह्याद्वारे इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या. इंदिरा गांधींच्या जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस इत्यादी अनेक राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबण्यात आले, प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना स्थगिती देण्यात आली, विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त करण्यात आली, रा.स्व. संघ व इतर काही संघटनांवर बंदी आणली गेली. एकप्रकारे आणीबाणी मुळे संपूर्ण लोकशाही प्रक्रियेला खीळ घालण्यात आली.
माजी आमदार प्राध्यापक मनोहर पटवारी यांना आदोंलनात सहभागी झाल्याबद्दल 9 महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागला होता . माजी आमदार प्रा पटवारी यांना समाजवादाचे बाळकडू घरातूनच समाजवादाचे पक्के समर्थक आणि वडील दिगंबरराव भीमराव पटवारी यांच्याकडून मिळाले होते. पटवारी परिवारातील वातावरणच जे पी आणि राम मनोहर लोहिया यांच्या विचाराने प्रेरित झालेले होते. तशातच माजी आमदार मनोहर पटवारी यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या लोकशाही हिरावून घेण्याच्या तंत्राला विरोध करत आंदोलनात उडी घेतली. त्यांच्या समावेत उदगीर मधील अनेक मंडळी सहभागी होती.
आणीबाणी काळातील आदोंलकांची यादी👇👇👇👇👇
आणीबाणी 25.06.2025



