महाराष्ट्र

डॉ. किरण मोघे व हरि मोकाशे यांना शासनाचे पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या वतीने उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार आणि उत्कृष्ट शासकीय अधिकारी कर्मचारी पुरस्कार (माहिती महासंचालनालय अंतर्गत) आज घोषित करण्यात आले यात 2021 2022 आणि 2023 साठीचे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.

डॉ किरण मोघे
हरि मोकाशे

महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विविध नावाने दिले जातात. या अंतर्गत 2019, 20, 21, 22, 23 या पाच वर्षातील लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार राही भिडे, सुधीर पाठक, भाऊ तोरसेकर, विजय बाविस्कर, बाळासाहेब जाधव यांना जाहीर करण्यात आला आहे.
याशिवाय विविध गटातील पुरस्कारांची घोषणा देखील आज करण्यात आली. त्यात 2021 साठी अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार श्री मंगेश वैशंपायन यांना, राज्यस्तरावरचा बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार कोणालाही जाहीर झाला नाही. तर यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट मराठी माहिती व जनसंपर्क विभाग पुणे येथील उपसंचालक डॉक्टर किरण मोघे यांना जाहीर झाला आहे. या अंतर्गत प्रादेशिक पातळीवरील पुरस्कार देखील जाहीर झाले असून मराठवाडा स्तरीय अनंतराव भालेराव पुरस्कार श्री दत्तात्रेय देशमुख यांना जाहीर झाला आहे.
तर 2022 मधील पुरस्कारांमध्ये यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गटासाठी श्रीमती वर्षा फडके आंधळे यांची निवड करण्यात आली आहे. तर मराठवाडा स्तरावरील अनंतराव भालेराव पुरस्कार संतोष देशमुख यांना जाहीर झाला आहे. त्याचबरोबर 2023 मधील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाले असून यात यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट श्रीमती वृषाली पाटील यांना जाहीर झाला असून, मराठवाडा स्तरीय अनंतराव भालेराव पुरस्कार लातूर येथील हरी मोकाशे यांना जाहीर झाला आहे.
या तिन्ही वर्षाच्या पुरस्कारार्थीनमध्ये निवड समितीला पात्र प्रवेशिका भेटल्या नसल्याची खेदजनक बाब देखील दिसून येते. कारण पत्रकारिता पुरस्कार हा सामाजिक भान आणि जाण ठेवून सामाजिक विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आणि तशा प्रवेशिका आल्या तर त्याबद्दल दिला जाऊ शकतो परंतु अनेक पुरस्काराला पात्र प्रवेशिका उपलब्ध नसल्याचं या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे.
Dgipr News Fold 24 June 2025 (1) (1)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/