लातूर जिल्हा

गांधी मार्केट चौकास ‘धर्मवीर छत्रपती संभाजीराजे चौक’ असे नाव द्या

सुरेश जाधव यांची मागणी

लातूर – लातूर शहरातील गांधी मार्केट परिसरातील मांजरा हॉस्पिटल कॉर्नर येथील चौकास ‘धर्मवीर छत्रपती संभाजीराजे चौक’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजपा सिद्धेश्वर मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेश जाधव यांनी आज महानगरपालिकेकडे लेखी निवेदनाद्वारे केली.

छत्रपती संभाजी महाराज हे इतिहासातील शौर्य, निष्ठा आणि बलिदान यांचे महान प्रतीक आहेत. हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले बलिदान अजरामर आहे. आजच्या नव्या पिढीला त्यांच्या प्रेरणादायी जीवनाचे दर्शन व्हावे आणि त्यांच्या शौर्याचा अभिमान वाटावा, यासाठी सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या नावाने चौकांची नावे देणे गरजेचे असल्याचे श्री. जाधव यांनी निवेदनात नमूद केले आहे.

सदर मागणीस परिसरातील नागरिकांचा भरभरून पाठिंबा लाभलेला असून, लवकरात लवकर पालिकेने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी काकासाहेब चौगुले, सुहास कांबळे, दीपक सावंत, ॲड . विक्रम गायकवाड, महावीर आयवाले, सूरज अळने, धनराज जाधव, बालाजी जाधव, विकास रणदिवे, गोविंद जाधव, बालाजी होनमाने, अजय एडके, व्यंकटेश जाधव, रतन जाधव, धीरज जाधव, कार्तिक जाधव, राजकुमार गडदे, श्री. कावळे, अनिल रणदिवे, राहुल एडके, सुनिल रणदिवे , बाळू रणदिवे, सुनिल जाधव, विशाल आयवाले, सुमित सुरवसे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/