FLash

संदिग्ध माहितीचे असे करा फॅक्ट चेक

सोशल मीडिया, आजकाल माहितीच्या वेगवान विस्तारासाठी हे माध्यम अतिशय प्रभावी व महत्त्वाचे ठरत आहे. पण या माध्यमाचा वापर बेजबाबदारपणे आणि मनमानी पद्धतीने केला जात असल्याने आता हे माध्यम समाजाला सोसत नसल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे या माध्यमातील माहितीची तपासणी अर्थात फॅक्ट चेक अत्यंत गरजेची ठरते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अलीकडे मोठ्या प्रमाणात मिस इन्फॉर्मेशन,डिस इन्फॉर्मेशन मोठ्या प्रमाणात पसरवली जात आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. त्याचे परिणामही गंभीर आणि चुकीचे होत आहेत. म्हणून या संदर्भात आता (प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो) पत्र सूचना कार्यालय, दिल्ली यांच्या वतीने फेक न्यूज विरोधातील लढा तीव्र केला जात आहे. आपणासही एखाद्या माहिती संदर्भात संभ्रम असेल तर अशी माहिती आपण या ठिकाणी देण्यात आलेल्या व्हाट्सअप नंबर वर किंवा ईमेल वर पाठवून सदर माहितीची फॅक्ट चेक करू शकता.
यासाठी फक्त आपण थोडसं सजग राहून आपल्यापर्यंत आलेली माहिती खरी आहे खोटी आहे किंवा दिशाभूल करणारी आहे हे तपासून पाहण्यासाठी खालील व्हाट्सअप नंबर किंवा ईमेल वर पाठवून द्यावी. खातर जमा झाल्याशिवाय अशी माहिती आपण पुढे फॉरवर्ड करू नये याची दखल घेणे आवश्यक ठरते. कारण इतरांकडून आलेली माहिती खातरजमा केल्या शिवाय पुढे पाठवू नये. ही बाब कायदेभंगाचीच आहे.
#FakeNews विरोधातील लढा एकत्रितपणे जिंकूया!

माहिती जबाबदारीपूर्वक सामायिक करा, राष्ट्रीय सुरक्षेला सहकार्य करा. कोणतीही चुकीची माहिती आढल्यास #PIBFactCheck कडे तक्रार करा

अधिक माहितीसाठी ‘पीआयबी फॅक्ट चेक’ला संपर्क साधा
WhatsApp: +91 8799711259
ईमेल: so*********@*****ov.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/