शाहूत 6,7 मार्चला अर्थशास्त्राचे राष्ट्रीय चर्चासत्र

लातूर :शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे, राजर्षी शाहू महाविद्यालय आणि भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद (ICSSR) यांच्या संयुक्त विद्यमाने “भारत आणि जागतिक दक्षिणेकडील सार्वजनिक धोरण: सिंहावलोकनात्मक विश्लेषण” या विषयावर ६ व ७ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादा चे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील हे असणार आहेत. या परिसंवादात विशेष व्याख्याते प्रोफेसर राजेंद्र धाने, गव्हर्मेंट कॉलेज, धारवाड -कर्नाटका, जालना येथील प्रोफेसर दिलीप अर्जुने (मा. मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष) यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच देशातील, विविध राज्यातील प्राध्यापक ,संशोधक विद्यार्थीही आपल्या संशोधन पेपरचे सादरीकरण करणार आहे तरी या परिषदेत सर्व संशोधक, मार्गदर्शक, प्राध्यापक, संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे उपप्राचार्य सदाशिव शिंदे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बी. पी. गाडेकर यांनी केले आहे.




