महाराष्ट्र

आंबा निर्यातीसाठी हे काम तातडीने करा

युरोपियन यूनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्या मँगोनेट प्रणालीव्दारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. सन २०२४-२५ मध्ये आज अखेर महाराष्ट्र राज्य ९ हजार ४५९ निर्यातक्षम आंबा बागांची नोदणी झालेली आहे. निर्यातक्षम आंबा बागाची मँगोनेट या ऑनलाईन प्रणालीवर नोंदणी करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ होती. परंतु, अपेडा नवी दिल्ली कार्यालयाकडे विनंती करूनही मुदत २८ फेब्रुवारी, २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
त्यामुळे उर्वरित कालावधीत विशेष मोहीम राबवून आंबा बागांची नोंदणी कृषी विभागामाफत करण्यात येणार आहे. युरोपीय युनियन व अमेरिका देशाला आंबा निर्यात करण्यासाठी क्षेत्रीय , शेतकरी स्तरावर ठेवायचे दस्तऐजवचे विहीत प्रपत्रात जनत करण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत. निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यात प्रपत्र- 1 मध्ये अर्ज करावा. अर्जासोबत सातबारा, आठ अ , आधारकार्ड जोडावे. त्यानंतर तपासणी अधिकाऱ्यांमार्फत कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्ष कृषि पर्यवेक्षक, कृषि अधिकारी यांच्यामार्फत क्षेत्राची तपासणी करुन प्रपत्र 4 अ मध्ये अहवाल जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांना सादर केला जातो. त्यानंतर 2 ब प्रपत्रात नोंदणी प्रमाणपत्र अदा केले जाते. शेतकऱ्यांनी पिक संरक्षणाच्या दृष्टीने शेतात राबविण्यात येणाऱ्या महत्वाच्या बाबींच्या नोंदी प्रपत्र क मध्ये नोंदी वेळेत घेणे आवश्यक आहे.
सर्व आंबा बागायतदारांनी सन 2024-2025 मध्ये चालू हंगामाकरिता नोंदणी करण्यासाठी संबंधित कृषी सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून मॅगोनटद्वारे नोंदणीसाठी त्वरीत अर्ज करावेत. प्रथम नोंदणी व नूतणीकरण करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, सातबारा , आठ अ , बागेचा नकाशा व आधारकार्ड इत्यादी कागदपत्राची आवश्यकता आहे. मँगोनेटद्वारे नोंदणी करण्याची वाढीव व अंतिम मुदत 28 फेब्रुवारी, 2025 अशी आहे. निर्यातक्षम आंबा बागांची वेळेत नोंदणी करण्याकरिता संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून विहीत मुदतीत नोंदणी करण्याचे आवाहन फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/