महाराष्ट्र

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी अर्ज केला का

शेवटची तारीख व लिंक पहा

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून सामाजिक न्यायप्रस्थापने आणि सामाजिक विकासात योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सामाजिक न्याय विभागामार्फत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते त्यासाठी अर्ज करावा लागतो

मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांसाठी दि. १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज दाखल करावा लागेल.

इच्छुक स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांनी पुरस्कारासाठी त्यांचे विहीत नमुन्यातील अर्ज त्या-त्या जिल्ह्य़ातील सहायक आयुक्त, समाज कल्याण विभागात येथे १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सर्व नमूद कागदपत्रांसह दाखल करावेत. अर्जाचा नमुना सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या पुरस्काराची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर, उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. अर्ज करण्याची लिंक 👇👇👇
https://sjsa.maharashtra.gov.in/

https://sjsa.maharashtra.gov.in/

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/