FLash

उदगीरच्या वधुवर परिचय मेळाव्याच्या अध्यक्ष पदी डॉ रवि मुळे

लातूर – लिंगायत महासंघ शाखा उदगीरच्या वतीने या वर्षी लिंगायत समाजाचा आठवा वधुवर परिचय मेळावा हा उदगीर येथे रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी होणार असुन या मेळाव्याच्या संयोजक अध्यक्षपदी डॉ रवि रमेश मुळे यांची निवड लिंगायत महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार सर यांनी केले असल्याचे लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले.
या ही निवड उदगीर येथे काल गुरुवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली.
बैठकीला लिंगायत महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार सर हे उपस्थित होते.प्रा बिरादार हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की ,या वर्षीपासून उदगीर येथे होणारा लिंगायत समाजाचा मेळावा हा संपूर्णपणे मोफत असेल.या मेळाव्यात लिंगायत समाजातील सर्व पोटजात उपजाती यांचा समावेश राहील.प्रमुख पाहुणे निमंत्रित करताना प्रत्येक पोटजात, उपजातीच्या मान्यवरांना आमंत्रित केले जाणार आहे.


तसेच या मेळाव्यात गरीब श्रीमंत ,उच्चशिक्षित, कमी शिकलेले ,विधवा, विधुर यांच्यासह घटस्फोटीत उपवर उपवधु व पालकांना सहभागी होता येणार आहे.नाव नोंदणी मोफत , प्रवेश मोफत व वधुवरांची नाव नोंदणी मेळाव्याच्या दिवशी व मेळाव्याच्या ठिकाणी करण्यात येणार आहे.मेळाव्याच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी व नियोजनासाठी या मेळाव्याच्या संयोजक अध्यक्षपदी डॉ रवि रमेश मुळे यांची निवड करण्यात आली आहे.
मेळाव्याच्या दिवशी उपस्थित वधुवरांची नोंद असलेली पीडीएफ फाईल मोफत दिली जाणार आहे.हा मेळावा पुर्णपणे सामाजिक बांधिलकीतुन व पुर्णपणे वधुवर मेळावा मोफत होणार आहे
या बैठकीला लिंगायत महासंघाचे उदगीर तालुकाध्यक्ष चंद्रकांत सिरसे, शहराध्यक्ष भिमाशंकर शेळके ,बापुराव शेटकार ,अशोक कडोळे, संजय शिवशेट्टे , प्रमोद पांढरे,यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.अशी माहिती लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/