तहव्वुर राणा लवकरच भारताच्या स्वाधीन

मुंबईवरील 2008 ला झालेल्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वुर हुसेन राणा अर्ज अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला, त्याने आपल्या प्रत्यार्पनाला स्थगिती द्यावी म्हणून अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. या हल्ल्यात एकूण 170 पेक्षा अधिक जणांचा बळी गेला होता.
तहव्वुर राणाने भारतात प्रत्यार्पण केल्यानंतर त्याला योग्य न्याय मिळणार नाही आणि त्याच्यावर अत्याचार केले जातील अशी आशंका न्यायालयात व्यक्त केली होती. त्याची ही आशंका फेटाळून लावत न्यायालयाने प्रत्यापनावर स्थगिती देण्यास नकार दिला.
मागच्याच महिन्यात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील तहव्वुर राणा यांच्या प्रत्यार्पनाला मंजुरी दिली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी राणा सारख्या अतिरेक्याला लवकरच भारताच्या स्वाधीन केले जाईल असे जाहीर केले होते.
राणा याच्याकडे केनेडियन नागरिकत्व असून तो मुळचा पाकिस्तानी आहे. त्याचावर मुंबईवर झालेला हल्ल्यात सहभाग असल्याचा आरोप आहे. 2008 साली मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात 170 पेक्षा जास्त जणांचा बळी गेला होता. तपासणीत राणाचे नाव पुढे आले होते.
अमेरिकेत त्याला लष्कर-ए-तोयबा (एलईटी) या प्रतिबंधित संघटनेला पाठिंबा दिल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले.
भारत गेल्या काही काळापासून त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे. २६/११ च्या हल्ल्याच्या संदर्भात, राणावर त्याचा सहकारी डेव्हिड कोलमन हेडली, ज्याला दाऊद गिलानी म्हणूनही ओळखले जाते, याला मदत केल्याचा आरोप आहे, ज्याला त्याच्या अमेरिकन आई आणि पाकिस्तानी वडिलांद्वारे अमेरिकन नागरिकत्व मिळाले होते. अमेरिकन अधिकाऱ्यांनी ऑक्टोबर २००९ मध्ये हेडलीला अटक केली.



