महाराष्ट्र
सुरु झाली शाळा

सुरू झाली शाळा
==========
पहिलाच दिवस, सुरू झाली शाळा
घणघण घंटी वाजे,मुलं झाली गोळा
नवं नवं दप्तर , नवी नवी पुस्तक
आनंदी चेहरा,आनंदाने फुले मुखं
कोणी पास, कोणी झाली नापास
सवंगडी भेटता,करीती विचारपूस
मन आनंदाने फुलते, बागडते
शाळेच्या मैदानावर खेळात रंगते
स्वप्न मनात,भविष्याचे घोळते
शिक्षण शिकता, भविष्य घडते
थोर मोठ्याचा एक अनमोल सल्ला
कधीच बुडवू नये बालपणी शाळा




