
लातूर :पोलिस आणि सामान्य जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करताना पोलिसांची विश्वासार्हता वाढवण्याचे कार्य विभागीय पोलीस प्राधिकरणाच्या वतीने केले जात असल्याचे श्री मिलिंद बिलोलीकर (अध्यक्ष, विभागीय मराठवाडा पोलीस तक्रार प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर) यांनी म्हटले.
सामान्य माणसाच्या पोलिसांच्या संदर्भातल्या काही तक्रारी असतील तर अशा तक्रारी या प्राधिकरणामार्फत निकाली काढल्या जातात. यासाठी साध्या कागदावर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विरोधात काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी कोणतीही भीती न बाळगता प्राधिकरणाकडे कराव्यात असे आवाहन केले आहे.
अशा तक्रारी करताना तक्रार कर्त्याला काही गोष्टींची खातर जमा करावी लागते त्यात
पोलीस मिसकंडक्ट अर्थाथ पोलिसांनी नाहक मारहाण करणे, शिव्या देणे, नागरिकांना विनाकारण पोलीस ठाण्यात बसवणे, कोणतेही कारण नसताना गुन्हा दाखल करणे,पैशाची मागणी करणे, गुन्ह्याची तीव्रता कमी करणे, सामान्यांना अपनास्पद वागणूक देणे यासारख्या गोष्टी याअंतर्गत समाविष्ट होतात.
प्राधिकरण काही मर्यादेत राहून काम करते
1.एक वर्ष च्या आत असलेल्या तक्रार दाखल करून घेणे. 2. तक्रारदाराने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्याच्या वरीष्ठ अधिकारी कडे तक्रार करणे आवश्यक असते.
3.वरीष्ठ पोलीस निरीक्षक पर्यंत च्या तक्रारी दाखल करता येतात. त्यापुढील वरीष्ठ अधिकार्यांच्या तक्रारी राज्य प्राधिकरणाकडे कराव्या लागतात.
प्राधिकरणकडे आत्तापर्यंत 680 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी 230 तक्रारी सोडवल्या आहेत.
4 पोलीसाच्या तक्रारींसाठी कोर्टात जाण्याची आवश्यकता नाही.
प्राधिकरणकडे तपास आणि कारवाई करण्याची सूचना देण्याचे अधिकार आहेत. प्राधिकरणाच्या वतीने स्वदखल घेऊन पोलिसांनी केलेल्या चुका बद्दल गुन्हा दाखल केला जातो. तक्रार कर्त्याला तक्रारी बाबत पुरावे सादर करावे लागतात. बोगस तक्रार असेल तर तक्रार करणाऱ्यास शिक्षा होऊ शकते.
सामान्य नागरिकांच्या मानसन्मान संदर्भात पोलिसांना प्राधिकरणाच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. विवेकानंद संस्कार संस्थेच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी अॅड संजयजी पांडे, जेष्ठ पत्रकार श्री प्रदीप नणंदकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
dtca. aurangabad @gmail
WhatsApp no 9850940300



