मराठवाडा
ग्रामीण साहित्य संमेलन पळसप

पळसप: ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक नेतृत्वाने आपले योगदान दिलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या जाणता राजा ने ग्रामीण कष्टकरी लोकांना न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला त्याच गोष्टीमुळे ग्रामीण भागाचा विकास शक्य होत असल्याचे प्रतिपादन साहित्यिक आसाराम लोमटे यांनी केले.
शिक्षण महर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप,आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहावे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन पळसप जिल्हा धाराशिव येथे आज पार पाडले. या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सहकार राज्यमंत्री बाबासाहेब पाटील, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.
संमेलनात संविधानाचा अमृत महोत्सव आणि मानवी मुल्ये या विषयावर माजी कुलगुरू डॉ सुधीर गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी प्राचार्य डॉ नागोराव कुंभार, मनिषा तोकले आणि डॉ.शिवानंद भानूसे यांचा सहभाग या परिसंवादात होता.
तसेच कथाकथन आणि कवी संमेलन देखील आयोजित करण्यात आले आहे.