Special Story

पालक- पाल्यातील तणावाने घेतला पालकांचा जीव

हल्ली पालक आणि पाल्य यांच्यात अपेक्षा आणि अपेक्षाभंगावरून छोट्या-मोठ्या पासून ते मोठ्या पातळीपर्यंतच्या कुरबुरी, कौटुंबिक ताणतणाव वाढत आहे. याचा परिणाम ही कोवळी मुलं अतिशय टोकाचा विचार करत काहीतरी भयंकर करत आहेत. या संदर्भातली लखनऊ तील घटना ही डोळ्यात अंजन घालणारी ठरावी.

मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी मुलावर अभ्यासाचे सतत प्रेशर आणून त्याला अभ्यासासाठी प्रेरित करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि शेवटी मुलाने तणावात येऊन आपल्याच वडिलांचे शिर आणि पाय धडा वेगळे करून त्यांचा जीव घेतला. ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना लखनऊमध्ये घडली. औषध विक्रेते असलेले मानवेंद्र सिंग यांचा मुलगा अक्षतप्रताप सिंगने आपल्या वडिलांचे हातपाय आणि शीर धडा वेगळे करून ते इतरत्र फेकून वडिलांचे शरीर देखील जाळण्याचा प्रयत्न केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.

त्याने केलेले हे भयंकर कृत्य लपवत उलट पोलिसांनाच आपले वडील हरवल्याची तक्रार दिली होती . वडीलांची हत्या होतांना त्याच्या लहान बहिणीने पाहिले होते .परंतु तिला त्याने गप्प राहण्याची धमकी दिली होती. अभ्यासाचे प्रचंड टेन्शन ,वडिलांचा मुलाने डॉक्टर बनावे असा अट्टाहास आणि बेफिकिरी मनोवृत्तीचा अक्षत सिंग याने वडिलांच्या डॉक्टर बनण्याचं स्वप्नाचा कधीही विचार केला नाही.यापूर्वीही वडिलांसोबत होत असलेल्या वादामुळे तो घरातून पळून गेला होता. तो परत आल्यानंतरही त्याचे आणि वडिलांचे सतत खटके उडत राहिले आणि त्यातून त्याने शेवटी वडिलांची अशी क्रूर हत्या केली .
मुलांकडून त्यांच्या वडिलांची किंवा कुटुंबातील इतर सदस्यांची हत्या (ज्याला पॅरिसाइड किंवा बाल कौटुंबिक हत्याकांड म्हणतात) करण्याच्या अनेक घटना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घडत आहेत बहुतेक वेळा पालक मुलांना मारतात. अमेरिका आणि युरोपमध्ये दरवर्षी होणाऱ्या एकूण हत्याकांडांपैकी २-४% पॅरिसाइड आहेत, एकट्या अमेरिकेत दरवर्षी २००-३०० अशी प्रकरणे होतात,ज्यात प्रामुख्याने पालकांकडून अत्याचार केलेल्या किशोरवयीन मुलांद्वारे घडतात.
मुलांकडून पॅरिसाइड बहुतेकदा गंभीर, दीर्घकालीन होणारे पालकांचे अत्याचार, दुर्लक्ष किंवा मारहाणीमुळे उद्भवतात, ज्यामुळे निराशा, राग आणि यातना संपवण्याची गरज निर्माण होते. पालकांकडून होणारे वारंवार अपमान, विश्वासघात मनाविरुद्ध कराव्या लागणार गोष्टी आणि पालकांकडून एकाच एका गोष्टीसाठी केले जाणारे हट्ट यामुळे गोंधळाच्या स्थितीत सापडलेली ही मुलं आपल्या या सर्व परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी धडपडत असतात .आणि कधीकधी मानसिक विकारासारख्या समस्यां यात अंतर्निहित मानसिक आरोग्य बिघडले की हे सूड उगवण्याच्या भावनेने प्रेरित होतात आणि टोकाचे पाऊल उचलतात .

यासंदर्भात मानसशास्त्रज्ञ असे सांगतात की मुलांकडून होणारे पॅरिसाइडची प्राथमिक कारणे ही गंभीर शारीरिक, लैंगिक किंवा भावनिक अत्याचारात मुले अडकतात, त्यांना जेव्हा यातून सुटका अशक्य वाटते तेव्हा स्वतःचे रक्षण करण्याची हताश कृती करतात. व्यसन, कौटुंबिक दूर्लक्ष वा हिंसाचार असलेली अकार्यक्षम कुटुंबे तणाव वाढवतात. स्किझोफ्रेनियासारखे मानसिक विकार भ्रमांना उत्तेजन देतात जिथे पालकांना धोकादायक म्हणून पाहिले जाते. असामाजिक व्यक्तिमत्त्वाचे गुण स्वार्थी हेतूंना .
पॅरिसाइड रोखण्यासाठी ताणतणाव असलेल्या कुटुंबांमध्ये लवकर हस्तक्षेप करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये मुलांचे गैरवर्तन शोधणे आणि मानसिक आरोग्य समर्थन यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक
कोविड-१९ च्या निर्बंधांमुळे ज्या घरात मुलांवरती अति निर्बंध असतात त्यांना अभ्यासाची सक्ती केली जाते आणि त्यांना आपल्या मर्जीप्रमाणे वागवले जाते अशा घरातून मुलांचे बाहेर पडणे कठीण बनले होते आणि कुटुंबातील सर्वच सदस्य एकत्रित राहत असल्यामुळे सर्वांचेच लक्ष लहान मुलांकडे होते परिणामी अशी लहान मुले अनेक वेळेला तणावाखाली वावरतात आणि त्यातून ते स्वतःच स्वातंत्र्य शोधण्या साठी काहीतरी वेगळ्या मानसिकतेचा विचार करून अशा घटनांना जन्म देतात म्हणून आपल्या घरातील वातावरण नेहमी हसत खेळत ठेवा मुलांची मुलींची मित्र-मैत्रिणीसारखे वागा त्यांना समजून घ्या त्यांच्या आवडीनिवडी जपा त्यांच्या बौद्धिकतेचा कल आणि क्षमता याचा निश्चित विचार करा आणि जर आपली मुले काही चुकीचं करत असतील तर त्यांना वेगळ्या पद्धतीने समजावून सांगा किंवा मनसोपचार तज्ञांच्या सहाय्याने त्यांना या गर्तेतून बाहेर काढा. निश्चितपणे ही मुलं आगामी कालखंडात कोणत्या आणि कोणत्या क्षेत्रात यश प्राप्त करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/