महाराष्ट्र

कल्पना भागवत प्रकरणात अनेक तपास यंत्रणाचा सहभाग

कल्पना त्र्यंबकराव भागवत (४५) यांना रविवारी बनावट ओळखपत्रे तयार करणे, आयएएस नियुक्ती पत्र तयार करणे आणि बनावट आधार कार्ड वापरून एका स्टार हॉटेलमध्ये जवळजवळ सहा महिने राहिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर येथे कार्यरत होत्या.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भागवत पाकिस्थानच्या इस्लामाबादेतील यामा गालिफ यांच्या संपर्कात होती, यामा हा तिचा अफगाण मित्र मोहम्मद अशरफ खिलचा भाऊ आहे, खिल गेल्या सात वर्षांपासून दिल्लीत वास्तव्याला आहे. कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) भागवत आणि पाकिस्तानस्थित नंबरमध्ये अनेक वेळा कॉल आणि माहितीची देवाणघेवाण झाल्याचे दर्शवितात,
पोलीसांच्या म्हणण्यानुसार, खिलने त्याच्या भावाचे आणि कुटुंबातील इतर दोन सदस्यांचे पाकिस्तान व्हिसा अर्ज दाखवणारे स्क्रीनशॉट शेअर केले होते आणि त्यात “पता नहीं मेरा सौदा किया होंगा. सौदा पाकिस्तान में हैं. सौदा वाह हैं” असे संदेश होते. दुसऱ्या संदेशात त्याने कथितपणे लिहिले होते, “मै अफगाण में हूं अभी”. या देवाणघेवाणीतील मजकूर ‘संशयास्पद’ होता आणि त्याची सखोल तपासणी केली जात असून, भागवत यांना १ जानेवारी ते २१ नोव्हेंबर २०२५ दरम्यान ‘वेगवेगळ्या व्यक्तीं’कडून ३,२६८,८६२ रुपये मिळाल्याचे पुरावे मिळाले आहेत तर त्यांच्या हॉटेलच्या खोलीतून दोन धनादेश आढळले आहेत ज्यात- एक राष्ट्रीयकृत बँकेने जारी केलेला १९ कोटी रुपयांचा आणि दुसरे खाजगी बँकेने ६ लाख रुपयांचा जारी केला आहे. भागवत यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करणाऱ्या लोकांना कलम १७९ अंतर्गत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. “त्यांना इतक्या मोठ्या रकमा पाठवण्याच्या उद्देशाबद्दल चौकशी केली जाईल,” असे वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले
पोलिसांनी तिची कोठडी १० दिवसांपर्यंत वाढवली आहे, गुप्तचर विभागाचे अधिकारी डिलीट केलेले व्हॉट्सअॅप चॅट्स एका पाकिस्तानीशी आणि अफगाण व्यापारी मोहम्मद अश्रफ खिलशी संबंध असल्याचे आढळल्यानंतर तिची चौकशी करत आहेत. १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्यावरील स्फोटादरम्यान ती दिल्लीत होती , १९ कोटी रुपयांचा चेक ताब्यात ठेवणे आणि एका उझबेक महिलेसाठी भारतीय व्हिसा मिळवण्याचे प्रयत्न यावरून अधिकाऱ्यांना हेरगिरीचा संशय आहे. चिनार गार्डन येथील तिच्या निवासस्थानी टाकलेल्या छाप्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानशी संबंधित आणखी बनावट ओळखपत्रे आणि आंतरराष्ट्रीय क्रमांक उघड झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/