FLash

मधुमेहीसाठी गोड बातमी

मधुमेह अर्थात डायबिटीज हा प्रत्येक 10 तून तीन ते चार व्यक्तींना सामान्यपणे होत असलेला आजार. भविष्यात भारत हे डायबिटीजची राजधानी होणार असे संकेतही जागतिक पातळीवरून मिळत आहेत. मधुमेह म्हटला की अनेक प्रकारची पथ्य आणि व्यायामाची सांगड यावर याद्वारे त्यावर नियंत्रण ठेवता येते. तरीपण मधुमेह संदर्भातल्या औषधी वर्षानुवर्षे घेऊन शरीराच्या अंतर्गत असणारे विविध अवयव प्रभावित होतात. त्यामुळे नेत्र, किडनी अशा वेगवेगळ्या अवयवांना हा आजार गंभीर इजा पोहोचू शकतो. म्हणून संशोधक सातत्याने मानवी शरीरावर होणाऱ्या डायबिटीजच्या आणि त्यांच्या औषधापासून होणाऱ्या परिणामा ंपासून रुग्णांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला काही प्रमाणात यश आले असून डायबिटीज मुळे निर्माण झालेल्या किडनी विकारावर मात करण्यासाठी आणि हृदयासंबंधी आजार कमी करण्यासाठी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने एका औषधाला इंजेक्शन ला परवानगी दिली आहे. ओझेम्पिक नावाचे सदर इंजेक्शन हे मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराच्या समस्येवर प्रभावीपणे उपयुक्त ठरू शकेल असा निर्मात्यांचा आणि संशोधकांचा दावा आहे. याबाबतीत क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाल्या असून अमेरिकेत त्याच्या वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. या सर्व चाचण्या प्राथमिक फेरीतील असून भविष्यात ती कितपत प्रभावी ठरू शकतील याचे उत्तर काळच देऊ शकेल.

ओझेम्पिक हे पोटाच्या, मांडीच्या किंवा वरच्या हाताच्या त्वचेखाली इंजेक्शन दिले जाते (स्नायू किंवा शिरेत नाही). रुग्णांला प्रत्येक इंजेक्शनसह इंजेक्शनची जागा बदलावी लागेल. प्रत्येक इंजेक्शनसाठी तीच जागा वापरू नये

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/