FLash

शिवराज पाटील चाकूरकर यांची अंत्ययात्रा 9.30 वाजता देवघर येथून

देशाचे माजी गृहमंत्री,लोकसभेचे माजी सभापती आणि पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांना सकाळी 9.30 पासून देवघर येथे त्यांना प्रथम मानवंदना दिली जाईल आणि अंत्ययात्रेला प्रारंभ होईल्.

ही अंत्ययात्रा आदर्श कॉलनी,छित्रपती शिवाजी महाराज चौक,दयानंद गेट,पीव्ही आर चौक,एमआयडीसी मार्गे वरवंटी येथे पोहचेल.तेथे पुन्हा 10.50 वाजता मानवंदना दिली जाईल आणि 11.00 वाजता अंत्य संस्कार केले जातील.
दरम्यान काल देवधर येथे अंत्यदर्शनासाठी हजारो कार्यकर्ते,नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले.त्यात काशी जगदगुरु डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या भवना व्यक्त करतांना शिवराज पाटील चाकूरकर हे राजकारणतील संत होते अशी भावना व्यक्त करून पाटील परीवारतील संदस्यांचे सांत्वन केले.यावेळी औसा येथिल गहिनननाथ महाराज् औसेकर हे देखिल उपस्थित होते.
मंत्री पंकजाताई मुंडे,ज्येष्ठ नेते दिलीपराव देशमुख यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांनी राजकारणात अनेकांना मोठे करण्याचे कार्य केले मात्र श्रेय कधीच घेतले नसून त्यांच्या जाण्याने मोठी पेाकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली.
लातूरचे आमदार अमित देशमुख,माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्यासह अनेकांनी पाटील साहेबांच्या निधानाबदद्यदल दु:ख व्यकत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/