महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्षपदी रमेश दाणेंची फेरनिवड

महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाच्या अध्यक्षपदी पुढील तीन वर्षासाठी ज्येष्ठ समाजसेवक श्री रमेश दाणे यांची फेर निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाच्या पुढील तीन वर्षासाठी अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी अकोला येथे जी आर डी टाटा स्कूलमध्ये एक दिवसीय लोकसेवक अधिवेशन घेण्यात आले होते. त्यात निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. प्रवीण भोयर यांनी श्री रमेश जाणे यांच्या नावाची घोषणा केली.
यावेळी बजरंग सोनवणे मुंबईच्या बजरंग सोनवणे यांचा
अध्यक्षपदासाठी चा दाखल केलेला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने श्री रमेश दाणे यांचा एकच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिला आणि त्यांची पुढील तीन वर्षासाठी चे अध्यक्ष म्हणून यावेळी घोषणा करण्यात आली. तर बजरंग सोनवणे हे पुढील तीन वर्षासाठी महामंत्री म्हणून काम करणार आहेत.
याप्रसंगी महाराष्ट्रात आणि देशात प्रतिकूल परिस्थिती असून गांधी विचारसरणी आणि पुरोगामी चळवळ कमकुवत करण्याचे प्रयत्न होत असताना ती वाचवण्याचे महत्त्वाचे कार्य आणि आव्हान सर्वोदय मंडळापुढे आहे. त्यामुळे सर्वांनी एक दिलाने काम केले तर या संकटावर आपण मात करू असे विचार नूतन अध्यक्ष श्री रमेश दाणे यांनी यावेळी बोलताना केले .
दरम्यान अधिवेशनाचे उद्घाटन लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांच्या हस्ते करण्यात आले आजच्या स्थितीत गांधी , विनोबा आणि जयप्रकाश नारायण यांचे विचार युवकांपर्यंत पोहोचण्याची निकड निर्माण झाल्याचे श्री माने यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले. याप्रसंगी शेख हुसेन ,प्रशांत गावंडे, डॉ. शिवचरण सिंह ठाकुर, बबनराव कानकिरड ,महादेवराव भुईभार, मधुकर शिरसाट, बजरंग सोनवणे यांनी आपले विचार व्यक्त केले . अधिवेशनात महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यातील लोकसेवा प्रतिनिधी उपस्थित होते अनेक जिल्ह्यातील सदस्यांनी रमेश जाणे यांचे अभिनंदन केले आहे.



