एआय व मशीन लर्निंगवर राष्ट्रीय कार्यशाळा

पुणे : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या श्री सिद्धीविनायक महिला महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र विभागाच्या वतीने *आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ऍण्ड मशीन लर्निंग* या विषयावर १७ व १८ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय स्तरावरील दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सद्य:स्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग या उदयोन्मुख तंत्रज्ञानांचा शिक्षण, संशोधन तसेच विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. या पार्श्वभूमीवर या कार्यशाळेमध्ये एआय व मशीन लर्निंग तंत्रज्ञानाची मूलभूत संकल्पना, त्यांचे शैक्षणिक व संशोधनातील उपयोग तसेच आंतरविद्याशाखीय अध्ययनातील संधी याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून सहभागीांना अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रात्यक्षिक सत्रे, संवाद आणि नवकल्पनांचा परिचय उपलब्ध होणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन दिनांक १७ मार्च रोजी सकाळी ९ वा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते होणार आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. रवींद्र देव, उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद लेले व सचिव डॉ पी. व्ही. एस. शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती या कार्यशाळेस लाभणार आहे. या कार्यशाळेत प्रा. डॉ. किर्ती महाजन, प्रा. डॉ. रवींद्र हेगडी, डॉ. अमेय पांगारकर, प्रा. डॉ. प्रदीप कुमार, डॉ. भूषण केळकर इत्यादी मान्यवर एआय संबंधी विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
संगणक शास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. वृषाली चांदोरकर या सदर राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत तसेच प्रा. सारिका कुलकर्णी व प्रा. जुई ओक सहसमन्वयक काम पाहत आहेत. संपूर्ण कार्यशाळेचे नियोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. प्रीती पोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कार्यशाळा सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. देशभरातील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांनी खालील नोंदणी लिंकद्वारे नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. https://forms.gle/5mKXw52thj1u2PgXA�



