FLash

लिंगायत महासंघाचे 22मार्च 2026ला तुळजापूर येथे अधिवेशन

लातूर -लिंगायत महासंघाच्या वतीने लिंगायत महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन रविवार दिनांक 22मार्च 2026रोजी त्रिमूर्ती मंगल कार्यालय लातूर रोड तुळजापूर जि.धाराशिव येथे लिंगायत महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असून सकाळी सहा वाजल्यापासून विविध सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच लिंगायत समाजाचे लातूर , धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील निवडून आलेले नगरसेवक, नगराध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य या सर्वांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे तसेच लिंगायत महासंघाच्या वतीने राज्यस्तरीय जीवन गौरव, अक्का महादेवी व समाज भूषण पुरस्काराचे वितरण हे यावेळी करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी व लिंगायत महासंघाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत काला पाटील व धाराशीव जिल्हाध्यक्ष शंकरराव पाटील गुंजोटीकर, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष वैजनाथ जटृटे व जिल्ह्यातील सर्व पदाधिका-यांनी आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/