महाराष्ट्र

रंगकर्मी दिलीप साळुंके सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय अध्यक्ष पुरस्काराने सन्मानित


धुळे। मराठा सेवा संघ प्रणित 32 कक्षाकडून राष्ट्रीय पातळीवर समाज जागृतीसाठी उपक्रम राबविण्यात येतात. दरवर्षी राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मोत्सव सोहळा सिंदखेडराजा येथे राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांची निवड करून सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे यंदाच्या राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात अत्यंत प्रतिष्ठेचा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय अध्यक्ष- 2026 हा राष्ट्रीय पुरस्कार संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषद भारत गणराज्यचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा रंगकर्मी, जेष्ठ पत्रकार दिलीप साळुंके यांना शिवसृष्टिच्या शिवधर्म विचारपिठावरून काल मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार, प्रदेशाध्यक्ष, प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ घाटगे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, ग्रंथ संपदेसह पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा शिवमती डॉ.निर्मलाताई पाटील, उद्योजक आर‌. एस. पाटील (इंदोर) राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुनील महाजन, डॉ. संजय पाटील डॉ . सोपान क्षीरसागर, डॉ . गिरीश ठाकरे, गणेश पाटील, राजेंद्र कोकाटे, उपस्थित होते.

पुरस्कारार्थी दिलीप साळुंके यांचे मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲड. पुरुषोत्तम खेडेकर, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली ते संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सतिश पावडे, प्रसिद्ध दिग्दर्शक (हास्यजत्रा) सचिन गोस्वामी, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, गझल नवाज भिमराव पांचाळे, उद्योजक कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील, जिएसटीचे जाॅईंट कमिशनर अविनाश भामरे, ॲड महेंद्र भावसार, दीपक भदाणे, विशाल देसले, मनोज आमले आदि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/