Special Story

लातूर मनपात लिंगायतांची साथ कोणाला


महानगरपिालका निवडणूका अंतीम टप्याकडे जात अतांनाच सर्वच् पक्षातील राज्यस्तरीय नेते जोर लावत आहेत.सर्वच राजकीय पक्ष आपल्या विजयाचा दावा करतांना मात्र गत काळात उपभाेगलेल्या सत्तेतून विकास झाला नसून तो अगामी काळात आम्हीच करु असा दावा प्रचारादरम्यान करत आहेत.

राज्यातील सर्वच महानगर पालिकांच्या निवडणूकांचा महासंग्राम अंतिम टप्याकडे जातांना अनेक रंजक आणि मतदारांना आकर्षीत करण्यासाठी अनेक भूलथापा मरल्या जात असल्याचे दिसून येते.तसे थापा मारणे हा राजकारण्यांचे दररोजचे काम असल्याने मतदारांनाही त्यात आकर्षण वाटत नाही म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थ्ज्ञाच्या निवडणूकात राज्यस्तरीय नेते,मंत्री,मुख्यमंत्र्यांना सभा घ्याव्या लागत आहेत ही बाब राजकीय नेतृत्वावरील विश्वास उडाला असल्याची दर्शवते.
लातूर महानगरपालिका ही अशाच प्रकारच्या विविध स्थानिक प्रश्नाभोवती फिरत असून यापूर्वीच्या निवडणूकीत सुरुवातील भजपाने आणि नंतर बंडखोंरांच्या मदतीने काँग्रेसने सत्ता उपभोगली. तरी देखिल आम्हीच खरे विकासाचे पाईक या अर्विभावात दोन्ही पक्ष एकमेकावर चिखलफेक करत आहेत. विकासाचे मुद्ये निवडणूक असले तरी लातूर च्या निवडणूका वेगळद्ययाच कारणासाठी चर्चील्या जातात तो मुद्या म्हणजे मराठा विरुध्द लिंगायत. लातूर शहरात अनेक प्रभागात लिंगायतांचे वर्चस्व असतांना देखिल भाजपाने लिंगायतांचे नेतृतव जे अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्याकडे होते ते काढून आ.संभाजी पाटील यांच्याकडे दिल्याने समाजातील मोठा वर्ग नाराज झाला आहे. ही घटना प्रत्यक्ष निवडणूकीला सुरुवात होण्यापूर्वी आणि राजकारणातील संत माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानंतर लगेचच घडल्याने त्याचे विपरीत पडसाद लिंगायत समाजात दिसून येत आहेत. या नाराजीचा फायदा काँग्रसने उचलण्याचा प्रयत्न केला नसता तर नवल ठरले असते.या नाराजीचा फायद्या घेण्यासाठी काँग्रसने एकूण नऊ लिंगायत उमेद्वार दिल्याने निवडणूकीत लिंगायतांची साथ मिळेल आणि सत्ता स्थापनेचे स्वप्न काँग्रेस नेते बाळगूण आहेत.
त्यांचे हे स्वप्न कदाचित खेरे देखिल ठरू शकते कारण भाजपा कडून नाराज लिंगायत समाजाची समजूत काढण्यासाठी एक नव्हे तीन तीन वेळा मोठे नेते लातूरात येवून भेटी दिल्या.तरी देखिल लिंगायतातील भाजपावरील नाराजी दूर करता आली नाहीआणि त्यांच्या पंश्नाची उततरे नेत्याकडे नसल्याने ते निरूततर होवून परत जावे लागले.यामुळे लातूरचे आ. अमित देशमुख यांच्या नेतृत्वात काँग्रेसने कांही प्रभागात प्रचारात मुसंडी मारल्याचे चित्र दिसून येत आहे. आ. अमित देशमुखांनी या निवडणूकीत जास्त रसे घेतला आहे.कारण गत महानगरपालिकेत काँग्रेच्या वतीने निवडून आलेल्या मातब्बर नगरसेवकांनी यावेळी काँग्रसची साथ सोडून घड्याळाशी जवळीक साधल्याने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न आ. देशमुख हे करत आहेत. त्यांना नाराज लिंगायतांची किती साथ मिळते हे मतदानानंतर समजेल.कारण लिंगायत नेतृत्वाने जी भूमीका घेतली आहे त्यावरुन मतदांरानी सामजंस्याने आणि प्रमाणिक उमेद्वारांना मतदान करण्याचे ठरपले तर अनपेक्षित निकाल देखिल लागू शकतात.
या निवडणूकीत कांही गोष्टी अंत्यत महत्वाच्या असून त्या आपणा समोर ठेवाव्या वाटतात. या निवडणूकीत नवखे , प्रामणिक आणि तळागाळात काम करणाऱ्या उमेद्वारांची संख्या बरीच मोठी आहे.आणि भाजपा ,काँगेस यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने कांही प्रभागात तगडे आव्हान उभे केले असून त्यांना एका आजी आणि एका माजी मंत्रयाची मोठी मदत होत आहे. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या राजा मनियार यांच्या सारख्या सच्चया नेत्याला वरीष्ठ नेत्यांकडून फारसे पाठबळ मिळत नसल्याने किल्ला एकाकी लढावा लागत आहे. काँग्रेसच्या माजी महापौर डॉ स्मिता खानापूरे यांना पुन्हा उमेद्वारी मिळाली असली तरी त्यांनी मागच्या काळात मतदारांशी फारसा संपर्क ठेवला नसल्याने आणि ट्यूशन परिसरात नागरीकांना होत असलेला त्रास दूर करण्यात फारसे यश मिळाले नसल्याने भाजपाच्या प्रेरणा होनराव यांना तेथे मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सतत ठवेलेला संपर्क ,चांगल्या व स्वच्छ प्रतिमेच्या जोरावर तर माजी नगरसेवक शैलेश गोजमगुंडे यांनी प्रभागाच्या विकासाकरिता आणि कोरोना काळात आणि नंतरच्या कालावधीत केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहयला मिळते. यावेळी भाजपाच्या अ आणि ब टिम मध्ये (निष्ठावंत) कांही प्रभागात चांगलींच लढत होईल असे चित्र रंगवले जात आहे. एक दोन प्रभागात केलेला प्रयोग जर यशस्वी झाला तर भाजपाच्या नेतृत्वावर केलेले आरोप सिध्द होवू शकतात आणि खरे निष्ठावंत कोण हे सत्य देखिल समोर येईल.
दरम्यान सर्वच् राजकीय पक्ष नाराज लिंगायतांना आपल्याकडे आकर्षीत करण्याचा प्रयतन करत असून जे जे प्रामणिक, चांगले ते ते लिंगायतांना हवे अशी भूमीका लिंगायत नेतृत्वाने घेवून मतदार जे करतील चांगलेच करतील असा आशावाद बाळगला असल्याचे लातूर मधील लिंगायतांचे नेते उमाकांत कोरे,बाबासाहेब कोर, दयानंद पाटील प्रा.सुदर्शन बिराजदार यांनी प्रतिक्रीया देतांना सांगीतले.कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणूकात कोणत्याच जात धर्मातील लोकांना नाराज करुन चालत नाही हे याच लातूरकरांनी यापूर्वी वेगवेगळ्या निवडणूकांत दाखवून दिले आहे हे वेगळे सांगायला नको.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/