स्पर्शज्ञान प्रणालीची आगेकूच

ब्रेल ही एक स्पर्शज्ञानाने लेखन आणि वाचन करण्याची पद्धत आहे, जिचा वापर अंध किंवा अल्पदृष्टी असलेल्या व्यक्तींकडून केला जातो. ही पद्धत ‘सहा-बिंदूंच्या सेल’वर आधारित आहे, ज्यामध्ये दोन स्तंभांत प्रत्येकी तीन बिंदू मांडलेले असतात. उठावदार बिंदूंच्या विविध जोड्यांमधून अक्षरे, अंक, विरामचिन्हे आणि चिन्हे दर्शवली जातात, ज्यामुळे वापरकर्त्यांना स्पर्शाद्वारे वाचन करणे शक्य होते.
नुकतेच आपण 4 जानेवारी रोजी ‘जागतिक ब्रेल दिन’साजरा केला. ब्रेल लिपीकडे केवळ वाचण्याची एक पद्धत म्हणून नाही, तर दृष्टिहीन व्यक्तींसाठी शिक्षण, सन्मान आणि समान सहभागाचा एक मार्ग म्हणून अधोरेखित करतो. हे महत्त्व भारताच्या सर्वसमावेशक शिक्षणासाठी ब्रेलचा स्वीकार करण्याच्या आणि त्याच्या प्रमाणीकरणाच्या प्रयत्नांमध्ये दिसून येते. भारतामध्ये ब्रेल लिपीची ओळख 1887 मध्ये झाली. परंतु, 1951 मध्ये भारतीय भाषांसाठी समान कोड असलेल्या ‘भारती ब्रेल’ या एकाच राष्ट्रीय मानकाचा स्वीकार करण्यात आला. 2011 च्या जनगणनेनुसार, भारतामध्ये 50,32,463 दृष्टीदोष असलेल्या व्यक्ती आहेत, ज्यांना आरोग्य सेवा, शिक्षण आणि रोजगार मिळवण्यात मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या लोकसंख्येची गरज ओळखून, भारतातील ब्रेल लिपीला ‘दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, 2016’ आणि ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ यांसारख्या उपक्रम, कायदे आणि धोरणांवर आधारित अधिकार-केंद्रित परिसंस्थेशी जोडण्यात आले आहे. हे प्रयत्न ब्रेलला साक्षरतेचे साधन आणि सार्वजनिक सुलभतेचे एक निकष म्हणून प्रस्थापित करतात.
भारत सरकारने दृष्टिदोष असलेल्या व्यक्तींच्या समावेशासाठी आणि सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून ब्रेल लिपीचा विकास, प्रसार आणि वापर वाढवण्यासाठी एक व्यापक परिसंस्था प्रस्थापित केली आहे. समानता, प्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाच्या घटनात्मक वचनबद्धतेवर आधारित असलेले हे उपक्रम शिक्षण, समाजकल्याण, कौशल्य विकास आणि डिजिटल सुलभता या सर्व क्षेत्रांमध्ये विस्तारलेले आहेत.
1) कायदेशीर पाया : दिव्यांग व्यक्ती अधिकार कायदा, 2016 (RPwD Act)
भारताची ब्रेल प्रणाली ‘दिव्यांग व्यक्तींचे हक्क कायदा, २०१६’ द्वारे एका हक्क-आधारित कायदेशीर चौकटीत रुजलेली आहे. हा कायदा दिव्यांग व्यक्तींसाठी सर्वसमावेशक शिक्षणाचे बंधन घालतो, ज्यामुळे ब्रेलचा वापर आणि साक्षरता ही एक मूलभूत आवश्यकता बनली आहे.
• शैक्षणिक संस्थांचे कर्तव्य म्हणून सर्वसमावेशक शिक्षण: या कायद्यानुसार, सरकारद्वारे अर्थसहाय्यित किंवा मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांनी सर्वसमावेशक शिक्षण आणि सुलभ पायाभूत सुविधा (इमारती/संकुल/सुविधा), रास्त दरात निवास सुविधा आणि योग्य साहाय्य सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
• शालेय शिक्षणातील ब्रेल आणि संवादाची साधने: जे विद्यार्थी अंध (किंवा कर्णबधिर-अंध) आहेत, त्यांच्यासाठी हा कायदा सर्वात योग्य भाषा आणि संवादाची माध्यमे/साधने वापरून शिक्षण देण्यावर भर देतो आणि ब्रेल व तिच्याशी संबंधित स्वरूपांना स्पष्टपणे पाठिंबा देतो.
• मोफत शैक्षणिक साहित्य आणि साहाय्यक उपकरणे (18 वर्षांपर्यंत): या कायद्यामध्ये ‘ठराविक मर्यादेपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके/शैक्षणिक साहित्य आणि साहाय्यक उपकरणे मोफत पुरवण्यासारख्या उपाययोजनांचा समावेश आहे.
2) भारती ब्रेल: भारताची प्रमाणित ब्रेल लिपी
भारत सरकारची ‘भारती ब्रेल’ला अनेक भारतीय भाषांसाठीची एकसंध लिपी म्हणून मान्यता आहे. ‘दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभाग’ आणि ‘राष्ट्रीय दृष्टीदोष व्यक्ती सक्षमीकरण संस्था’ (एनआयईपीव्हीडी) यांच्या मार्गदर्शनाखाली, 04 जानेवारी 2025 रोजी एक ‘मानक भारती ब्रेल कोड’ (युनिकोड मॅपिंगसह) प्रकाशित करण्यात आला आहे. शिक्षण आणि सुलभतेसाठी सर्व भारतीय भाषांमध्ये एकसमान ब्रेल प्रणाली अधिकृतपणे स्वीकारण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. या कोडच्या मसुद्यावर सार्वजनिक चर्चा केल्यानंतर आणि लोकांची मते जाणून घेतल्यानंतर, 03 डिसेंबर 2024 रोजी प्रकाशित झाल्यानंतर, हा अंतिम कोड स्वीकारण्यात आला आहे.
भारती ब्रेल कशा प्रकारे काम करते
1. भारतीय भाषांसाठी एकीकृत ब्रेल प्रणाली
• भारती ब्रेल’ ही बहुतांश भारतीय भाषांसाठी वापरली जाणारी प्रमाणित स्पर्शविषयक लेखन पद्धती आहे.
• विविध भाषांमध्ये अस्तित्वात असलेल्या अनेक विखुरलेल्या ब्रेल लिपींमध्ये सुसूत्रता आणून त्या सर्वांसाठी एकच, सुसंगत कोड तयार करण्याच्या उद्देशाने ही लिपी विकसित करण्यात आली.
• यामुळे दृष्टीदोष असलेले वाचक अनेक भारतीय भाषांसाठी एकच सामायिक ब्रेल प्रणाली शिकू शकतात आणि वापरू शकतात.
• यामध्ये प्रमाण सहा-बिंदू ब्रेल सेलचा वापर केला जातो.
2. प्रमाणीकरण आणि युनिकोड मॅपिंग
• सरकारने (NIEPVD/DEPwD च्या माध्यमातून) ‘स्टँडर्ड भारती ब्रेल कोड’ जारी केले आहेत, ज्यामध्ये युनिकोड मॅपिंगचा समावेश आहे, ज्यामुळे डिजिटल सुसंगतता प्राप्त झाली आहे.
• याचा अर्थ असा की, प्रत्येक ब्रेल सेल पॅटर्न एका विशिष्ट युनिकोड कोड पॉईंटशी जोडला गेला आहे. यामुळे डिजिटल वाचन-लेखन, स्क्रीन रीडर सपोर्ट, ब्रेल डिस्प्ले आणि सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स वापरणे सोपे झाले आहे.
• भारती ब्रेलमधील सुलभ डिजिटल मजकूर तयार करण्यासाठी युनिकोड मॅपिंग अत्यंत महत्त्वाचे आहे.
3. विविध भाषांमध्ये सुसंगत सादरीकरण
• स्टँडर्ड भारती ब्रेल कोड्स सामान्य स्पर्शनीय आराखड्याचा वापर करून हिंदी, मराठी, बंगाली, तेलगू, कन्नड, मल्याळम इत्यादी विविध भारतीय लिपींमधील स्वर, व्यंजन, अंक आणि विरामचिन्हे दर्शवण्यासाठी नियम प्रदान करतात
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे 2020 ब्रेल लिपीत एकीकरण
राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 स्पष्टपणे मान्य करते, की सर्वसमावेशकतेसाठी व्यावहारिक शिक्षण आधारांची आवश्यकता आहे – सहाय्यक उपकरणे आणि ब्रेललिपीतील शिक्षण साहित्यासह सुलभपणे अध्ययन -अध्यापन साहित्याचा समावेश आहे..
• राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दिव्यांग मुलांच्या सहभागाला प्राधान्य दिले आहे आणि त्यात असे म्हटले आहे की, वर्गखोल्यांमध्ये एकात्मतेला समर्थन देण्यासाठी भाषेला अनुकूल अध्यापन करण्यासाठी – मोठ्या अक्षरात आणि ब्रेललिपी सारख्या सुलभ स्वरूपात पाठ्यपुस्तकांसह – सर्व शिक्षण साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजे.
•



