महाराष्ट्र

जिमाअ युवराज पाटील राज्यस्तरीय जांभेकर पुरस्काराने सन्मानित

मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने पत्रकार कल्याण निधी ,फलटन यांच्या मार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील ( लातूरकर) यांना नुकताच एका कायक्रमात विधानपरिषेदेचे सभापती प्रा राम शिंदे याच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
देवगड तालूक्यातील पोंभूर्ले या जाभेंकर यांच्या मुळ गावी झालेल्या या सत्कार समारंभात राज्यातील इतरही पत्रकांराचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रा राम शिंदे यांनी जांभेकर यांच्या पत्रकारितेविषयी गौरवोद्वगार काढून आजच्या पत्रकारांनी तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक हितासाठी पत्रकारिता करावी असे आवाहन केले. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार,सिंधूदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे,पोलिस अधिक्षक मोहन दहिकर,पत्रकार कल्याण निधीचे कृष्णा शेवडीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रा राम शिंदे यांच्या विकास निधीतून बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्माारकासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/