महाराष्ट्र

राज्य किर्तन/समाजप्रबोधनाचा पुरस्कार- श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर यांना जाहीर

सन २०२४-२५ या वर्षीच्या राज्य सांस्कृतिक मंत्रालयाच्या पुरस्क्रांची घाेषणा झाली असून किर्तन/समाजप्रबोधन क्षेत्रातील पुरस्कार- श्री. गहिनीनाथ ज्ञानेश्वर औसेकर महाराज (2025)यांना जाहीर झाला आहे. त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

मुंबई. कलेच्या विविध क्षेत्रात प्रतिवर्षी नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन,कलादान,प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक,लोकनृत्य,लावणी/संगीतबारी,भारुड/विधीनाटय,वाद्यनिर्मिती,झाडीपटटी, खडीगंमत, दशावतार,नमन खेळे, वहीगायन, दुर्मिळ प्रयोगात्मक कला, प्रयोगात्मक कलेशी संबधित संस्था, ध्वनीतंत्रज्ञ,संगीत संयोजन,व्हाईस ओव्हर या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केलेली आहे अशा कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार यांनी आज केली.
ज्येष्ठ पुरस्कार तीन लक्ष, युवा पुरस्कार एक लक्ष प्रत्येकी मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.सदरील पुरस्कार हे लवकरच मुंबई येथे सर्व कलाकारांना सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.पुरस्कारर्थींची नावे पुढील प्रमाणे आहेत.

ज्येष्ठ पुरस्कार :-
नाटक – श्री अरुण कदम (२०२५), कंठसंगीत- श्री. धनंजय जोशी (2025), वाद्यसंगीत-श्री. विजय चव्हाण (2025), मराठी चित्रपट-श्री. शिवाजी लोटन पाटील (2025), उपशास्त्रीय संगीत- उदय भवाळकर (2025), किर्तन/समाजप्रबोधन- श्री. गहिनीनाथ ज्ञानेश्वर औसेकर महाराज (2025),
तमाशा- श्री. कोंडीराम आवळे(2025), शाहिरी- शाहिर मधुकर मोरे (2025), नृत्य- श्रीमती रंजना फडके (2025) आदींचा समावेश पुरस्कारार्थीत आहे.

वरील सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी तसेच मा.सांस्कृतिक कार्य मंत्री, ॲङ आशिष शेलार यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/