
माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी
15 सप्टेंबरपर्यंत माहिती सादर करण्याचे आवाहन. माझी सैनिकांच्या पत्नी व पाल्यांसाठी देखील विविध योजना जाहीर करण्यात आली असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन सैनिक कल्याण बोर्डाच्या वतीने करण्यात आले आहे
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त, तसेच साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळवणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोड, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे, तसेच देश, राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांचा विशेष गौरव पुरस्कार देवून गौरव करणायत येणार आहे.
राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी एकरकमी रुपये 10 हजार रुपये व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी एकरकमी 25 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच इयत्ता दहावीमध्ये 90 टक्के व बारावी मध्ये 85 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवूण उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांचाही गौरव करण्यात येणार असून यासाठी 15 सप्टेंबर, 2025 पर्यंत जिल्हा सैनिक कलयाण कार्यालय येथे अर्ज करा.
<
-
strong>माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
सन 2024-2025 मध्ये इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षेत 60 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या, तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, बी.एस.सी., बी.ए., बी.सी.ए., बी.बी.ए., बी. फार्म, बी.एड., एल.एल.बी. आणि एम. फार्म या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत असलेल्या जिल्ह्यातील माजी सैनिक आणि त्यांच्या विधवांच्या पाल्यांना शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी नवीन व जुन्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची संधी आहे.
इच्छुकांनी आपले अर्ज 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अर्जासोबत आवश्यक फॉर्म आणि इतर माहिती कार्यालयात उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे.
<ul>
माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना
जिल्ह्यातील माजी सैनिक, त्यांच्या पत्नी आणि वीरपत्नी यांच्या कल्याणासाठी शासनामार्फत विविध स्वयंरोजगार प्रशिक्षण योजनांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये ड्रोन पायलट, शेळीपालन, कॉम्प्युटर व मोबाइल दुरुस्ती, फायर फायटिंग, सुरक्षा रक्षक, मोटार दुरुस्ती, डेरी फार्मिंग, किरकोळ व्यवस्थापन, लेखापाल आणि मल्टिमीडिया आदी प्रशिक्षणांचा समावेश आहे.
इच्छुक माजी सैनिक, त्यांच्या पत्नी, आणि वीरपत्नी यांनी आपली नावे लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे नोंदवावीत. नाव नोंदणीसाठी दूरध्वनी क्रमांक 02382-228544 किंवा 9892809202 यावर संपर्क साधून 1 ऑगस्ट 2025 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले आहे.



