मराठवाडा

साबंअप्पा गिरवलकर कर्मयोगी लिंगायत रत्न पुरस्काराने सन्मानित

शिवा लिंगायत युवक संघटना


लातूर येथील शिवा लिंगायत युवक संघटनेच्या वतीने आयोजित दुसऱ्या VIP इव्हेंट 2025 लिंगायत वधुवर परिचय लातुर मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमात श्री. सांबाप्पा गिरवलकर यांना त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन शिवा लिंगायत युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री दयानंद पाटील यांनी,आंतरराष्ट्रीय पातळीवरील समाज बांधवांच्या साक्षीने VIP इव्हेंट 2025 लिंगायत वधुवर परिचय लातूर मध्ये कर्मयोगी लिंगायत रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


श्री सांबअप्पा गिरवलकर यांचा सत्कार करावा ही लिंगायतातील युवा पिढीची मनोमन इच्छा होती. गिरवलकर यांचे श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था ,लातूरच्या वाटचालीत त्यांचे बहुमोल योगदान आहे. विधिज्ञ म्हणून न्यायालयीन क्षेत्रात नावलौकिक कमावलेला आहे .सिद्धयोग ध्यान केंद्राच्या मार्फत अध्यात्मिक क्षेत्रातही आपण लातूरचे नावलौकिक वाढवले. आहे. आपण ज्येष्ठ समाज धुरीण, सुप्रसिद्ध उद्योजक, दासोहवृत्ती, दूरदृष्टी असणारे व्यक्तिमत्त्व ,शिस्तप्रिय, निर्मळ, उदार व्यक्तिमत्त्व म्हणून समाजासाठी भूषण आहेत. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर समाजातील उदयोन्मुख पिढी घडावी, यासाठी लिंगायत धर्मातील युवा पिढी च्या विनंतीला मान देऊन
श्री सांबअप्पा गिरवलकर यांनी सत्काराचा स्वीकार केला.

या वेळी शिवा लिंगायत युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री दयानंद पाटील, प्राचार्य डॉ सिद्रामप्पा डोंगरगे, श्री, शिवराज शेटकार, श्री कुमार स्वामी गणाचार्य,सौ माया दयानंद पाटील,कु.मयुरी दयानंद पाटील,चि रुद्राप्पा दयानंद पाटील, श्री सुहास अष्टके, श्री नागेश कानडे, श्री योगेश गिरवलकर,सौ माया मिसलगी,सौ. गिता शर्मा, श्री विश्वनाथ पाटील वन्नाळीकर, महादेव स्वामी सोलापूर श्री संबा खोत इचलकरंजी,व देशातील आठ राज्यातील व विदेशातील लिंगायत समाज व लातुरातील लिंगायत बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/