एकलकोंडेपणातून होणाऱ्या आत्महत्या एक यक्ष प्रश्न

आत्महत्या हा एक मोठा सामाजिक प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला आहे. कारण आत्महत्येच्या पाठीमागची कारण आणि त्याचे विश्लेषण हे अत्यंत गुंतागुंतीचे बनत चाललेत. क्षणिक रागाच्या भरातील आत्महत्या, कोणत्याही गोष्टीची नकारात्मक पचवण्याची क्षमता नसलेल्या कारणांच्या आत्महत्या, जीवनात काहीही शिल्लक राहिले नसल्याची भावना, किवा सुजान, सुदृढ, समाज भान असणार्या , मान – सन्मान, पैसा, प्रसिद्धी असलेल्या लोकांच्या आत्महत्या या कौटुंबिक पातळीवर, आर्थिक परिस्थिती चांगली असतांना देखील होतात हा प्रकार अत्यंत चिंतनीय आहे.
पैसा असूनही रिकामी मनं –
आपल्याला वाटतं की पैसा, प्रसिद्धी, समाजात मान-सन्मान मिळाला की माणूस आनंदी असतो, त्याचं जीवन सुरक्षित असतं. पण सध्याच्या घटनाक्रमाकडे पाहिलं तर ही समजूत चुकीची वाटते. अगदी उच्चशिक्षित, प्रतिष्ठित, समृद्ध लोक जे समाजात मार्गदर्शक म्हणून पाहिले जात होते – त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे.
आत्महत्येसाठी जोखमीच्या घटकांमध्ये मानसिक विकार , शारीरिक विकार आणि मादक पदार्थांचे सेवन यांचा समावेश आहे. काही आत्महत्या या तणावामुळे (जसे की आर्थिक किंवा शैक्षणिक अडचणींमुळे ), नातेसंबंधातील समस्यांमुळे (जसे की ब्रेकअप किंवा घटस्फोट ), किंवा छळ आणि गुंडगिरीमुळे होणाऱ्या आवेगपूर्ण कृती असतात. ज्यांनी पूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे ते भविष्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्नांचा धोका जास्त असतो. आत्महत्येचे प्रमुख साधनात बंदुक, विषारी किंवा झोपेची औषधे आणि विष यासारख्यांचे प्रमाण वाढले आहे. मानसिक विकार आणि मादक पदार्थांचे सेवन यावर उपचार करणे, आत्महत्येबद्दल काळजीपूर्वक तपासणी करणे महत्त्वाचे ठरते.
आत्महत्या हे जगभरातील मृत्यूचे १० वे प्रमुख कारण आहे. एकूण मृत्यूंपैकी अंदाजे १.५% आहे. दिलेल्या वर्षात, हे दर १००,००० लोकांमागे अंदाजे १२ आहे.२०१५ मध्ये जगभरात आत्महत्यांमुळे ८२८,००० मृत्यू झाले, जे १९९० मध्ये ७१२,००० मृत्यूंपेक्षा वाढले. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 35 ते 40 वयोगटापर्यंतच्या आणि महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण हे अधिक दिसून येतं. विकसनशील राष्ट्रांच्या तुलनेत विकसित राष्ट्रांमध्ये आत्महत्येच्या प्रमाण जवळपास तिप्पट दिसून येते.
अलीकडच्या काही घटना ज्या खूप विचार करायला लावणार्या आहेत. ज्यात
१) डॉ. वळसणकर (सोलापूरचे न्युरोसर्जन): यांनी आत्महत्या केली. एक यशस्वी डॉक्टर, समाजात मान असलेली व्यक्ती.
२) बाबासाहेब मनोहरे (लातूरचे मनपा आयुक्त): स्वतःवर गोळी झाडली, सध्या अत्यवस्थ स्थिर.
३) भैयू महाराज: प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु, समाजसेवक – पण अचानक आत्महत्या.
४) डॉ. शीतल आमटे: बाबा आमटे यांचं वारसत्त्व पुढे नेणाऱ्या, अत्यंत बुद्धिमान आणि प्रगल्भ विचारसंपन्न सामाजिक कार्यकर्त्या.
५) सुशांत सिंह राजपूत: प्रतिभावान कलाकार, त्याच्या आत्महत्येने सारा देश हादरला.
6. संत तुकाराम महाराजांच्या अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी वयाच्या 30 व्या वर्षी केलेली आत्महत्या मनाला चटका लावून जातात.
या संदर्भात जे. एस. चिखलीकर यांनी केलेले विश्लेषण.
Virtual World vs Real Life :- यामध्ये विशेष विचार करायला लावणारा आहे. त्यांचं social media presence खूप प्रभावी होतं –Facebook,twitter ,Instagram ,YouTube वर हजारो followers, त्यांचे विचार, ऊर्जा, आणि समाजहिताचे व्हिडिओ अनेकांना प्रेरणा देणारे होते. पण या आभासी जगात जेवढं कौतुक, तेवढंच त्यांच्या वास्तव आयुष्यात एकटेपण होतं. घरातील नातेसंबंध, विचारांचे मतभेद, किंवा अव्यक्त अस्वस्थता – या सर्व गोष्टी त्या व्हर्च्युअल कौतुकामागे दडलेल्या असतात हा विरोधाभास मनाला पोखरतो.
Virtual World म्हणजे काय ? Followers म्हणजे खरी साथ नसते.लाइक्स, कमेंट्स, views हे तात्पुरते समाधान देतात…
का घडतं असं ?
1. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष डिप्रेशन, ऍन्झायटी, बर्नआउट हे सायलेंट किलर आहेत. समाजात प्रतिष्ठा जपताना हे कुणालाही सांगता येत नाही.
2. एकटेपण आणि आंतरिक संघर्ष: गोंधळातही माणूस एकटा असतो. virtual जगात सक्रिय असूनही, घरात किंवा मनात असलेली पोकळी फार त्रासदायक असते.
3. समाजाच्या अपेक्षा आणि दबाव तू इतका मोठा आहेस, तुला काय कमी
4. वैयक्तिक आयुष्यातील तणाव कौटुंबिक मतभेद, नात्यातील क्लेश.
5. मोठ्या जबाबदाऱ्यांचं ओझं आपण काय शिकायला हवं?
मानसिक आरोग्यावर खुलेपणानं बोलणं.
केवळ आभासी जगात न अडकता खरे नातेसंबंध जपणं.
आपल्या जवळच्या लोकांच्या मनात काय चाललंय याकडे लक्ष देणं.एखादं व्यक्तिमत्व खूप प्रेरणादायी वाटतंय, त्याचा अर्थ तो माणूसही एकदम ठिक आहेच असं मानू नका शेवटी, माणूस मनाने आनंदी असावा लागतो – ना की बँक बॅलन्सने, ना फॉलोअर्सनी. Virtual World मध्ये कितीही ‘लाइव्ह’ दिसत असलो, खरे जीवन कधी कधी ‘म्युट’ असतं..


