डॉ जगदीश पाटील विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर

धुळे: प्राचार्य डॉ. जगदीश पाटील यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर नियुक्ती झाली आहे (विद्यावर्धिनी सभेचे डॉ. एम. वाय. वैद्य कला, प्रा.पी. डी. दलाल वाणिज्य आणि डॉ. डी. एस. शाह विज्ञान महाविद्यालयाचे)

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही एल माहेश्वरी यांनी अधिष्ठाता गटातून त्यांची नियुक्ती केली आहे.प्राचार्य डॉ. जगदीश पाटील हे विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेचे प्रभारी अधिष्ठाताही आहेत.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ.एन. के. ठाकरे, माजी आमदार शिरीष चौधरी (फैजपूर), मा. राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, प्रा. प्रकाश पाठक, विद्यावर्धिनी सभेचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील, गव्हर्निंग कौन्सिलचे सर्व सन्माननीय सदस्य, चेअरमन अक्षय छाजेड, सेक्रेटरी युवराज करनकाळ, जेष्ठ सदस्य पितांबर महाले व विनोद अग्रवाल यांच्यासह विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी अभिनंदन केले आहे.




