शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले…

छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा
💐💐💐💐💐
कुळवाडी – भुषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||
लंगोट्यास देई जानवी पोषींदा कूणब्यांचा |
काळ तो असे यवनांचा ||
शिवाजीचा पिता शाहाजी पुत्र मालोजीचा |
असे तो डौल जाहागिरीचा ||
पंधराशे एकूणपन्नास साल फळले | जुन्नर तें उदयास आले || शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले|
जिजाबाईस रत्न सापडले ||
हातापायांची नख़े बोट शुभ्र प्याजी रंगीले|
ज्यांनी कमळा लाजविले ||
वर ख़ाली टिर्या पोटर्या गांठी गोळे बांधले|
स्पटिकापरी भासले ||
सानकटी सिंहापरी छाती मांस दुनावले|
नांव शिवाजी शोभले ||
राजहौंसी उंच मान माघे मांदे दोंदीले|
जसा का फणीवर डोले ||
एकसारखे शुभ्र दांत चमकू लागले|
मोती लडी गुंतविले ||
रक्तवर्ण नाजूक होटी हासू छपविले|
म्हणोन बोबडे बोल ||
सरळ नीट नाक विशाळ डोळ्यां शोभले|
विषादें म्रुग वनी गेले ||
नेत्र तिखे बाणी भवया कामठे ताणिले|
ज्यांनी चंद्रा हाटविले ||
सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबले|
कुरळे केस मोघीले ||
आजानबाहू पायांपेक्षा हात लांबलेले|
चिन्ह गादिचे दिसले ||
जडावाची कडी तोडे सर्व अलंकार केले|
धाकट्या बाळा लेविवले ||
किनखांबी ठंकोचे मोती घोसाने जडले|
कलाबतुचे गोंडे शोभले ||
लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले|
डाग लाळीचे पडलेले ||
हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे|
पायी घुंगरू खुळखुळे ||
मारी लागोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले|
ख़ेळण्यावर डोळे फिरविले ||
मजवर हा कसा ख़ेळणा नाही आवडले|
चिन्ह पाळणी दिसले ||
टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले|
पाळण्या हालवू लागले ||
धन्य जिजाबाई जिने जो जो जो जो जो केले|
गातों गीत तिने केले ||
…….. महात्मा ज्योतिबा फुले
बहुजनाचे राजे
शिवनेरी गडावर सिंह जन्मला
उजळून निघाल्या दाही दिशा
सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यावर
प्रकाश पडला,संपली निशा
आपली माणसे आपली भूमी
गुलामगिरीतून मुक्त केले
हिंदवी स्वराज्य करून स्थपान
रक्षक रयतेचे रयतेचे राजे झाले
विखुरलेले मावळे मावळे
एकत्र केले सगळे सगळे
सर्वजण म्हणती माझे, माझे
शिवबा साऱ्या बहुजनांचे राजे
सूर्य चंद्र जगी जोवर असतील
वीर शिवाजी जिवंत असतील
बहुजनाच्या रक्ताच्या कणाकणात
शिवछत्रपती राजे सदैव दिसतील
कोटी कोटी वंदन शिवबाच्या चरणी
तुमच्यामुळे आज मुक्त आहें धरणी
अनंत अनंत रयतेवार उपकार
झेंडा फडकत ठेवू करू जय जयकार
इंजि. नागनाथ कलवले, लातूर



