लेख / काव्य
कोटी कोटी लेकराची, रमाई माय होती….

कोटी कोटी मानवाचे
============
कोटी कोटी लेकराची
रमाई माय होती
एक एक लेकरू गेलं
तरीही खंबीर होती
दुःखाचा डोंगर उरी
नाही सोडला धीर
भीमा फिरे वण वण
एकटीच तूच आधार
कष्ट किती भोगली
पाणी पिऊन जगली
ज्ञान सूर्य भीमाला
अखंड साथ दिली
स्वाभिमानी माता रमाई
स्वाभिमानी भीम माझा
रमाई तूझ्या त्यागामुळे
जग म्हणे ज्ञानाचा राजा
विसरू कसे उपकार
मिळते रोटी भाकरी,
तूझ्या भीमाच्या कष्टमुळे
होतो नेता,होई अधिकारी
बहुजनानो व्हावे एक
नका होऊ लाचार
भीम रमाईच स्वप्न
करू या साकार
माता रमाईच्या चरणी
निष्टेचे वाहू फुले
कोटी कोटी मानवचे
सुखाने जगतात मुले

इंजि. नागनाथ कलवले, लातूर



