लातूरकरांच्या अपेक्षापूर्तीसाठी ताकतीने प्रयत्न करेन
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

लातूरचा पालकमंत्री म्हणून येथील प्रश्न सोडवणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. लातूरकरांच्या विश्वासाला पात्र होण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागणार आहेत भोसले परिवार आणि लातूरकर यांच्यात पूर्वीपासूनच चांगले संबंध आहेत ते संबंध अधिक वृद्धिंगत व्हावेत, लातूरला विकसित लातूर बनवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मला ही जबाबदारी दिली असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
लातूर : लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून ऑनलाईन मीटिंग न घेता प्रत्यक्ष येत राहील, लातूरचे प्रश्न आणि त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करुन त्यांची सोडवणूक केली जाईल. लातूरच्या जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न काही दिवसात सोडून आपण जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करू असे आश्वासन लातूरचे पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी दिले.
अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या वतीने आयोजित स्नेहभेट मेळाव्यात ते बोलत होते.
लातूरच्या अनेक प्रश्नांची माहिती मला मिळाली आहे त्या कशा पद्धतीने सोडवायच्या त्याचा विचार येणाऱ्या काळात विविध बैठकातून केला जाईल. लातूर, मुरुड, बार्शी, कुर्डूवाडी, टेंभुर्णी हा रस्ता लवकरच विस्तारित चौपदरीकरणाचा केला जाईल, या कामातील अडचणी सोडवल्या जातील असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
तत्पूर्वी अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी लातूरमध्ये वेगवेगळ्या गटांच्या, समूहांच्या आणि एकंदरीत लातूरकरांच्या समस्या मोठ्या प्रमाणात असून त्या सोडवण्याची आवश्यकता आहे. लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न केवळ तीन कोटी वीस लाख रुपयामुळे अडून बसला असून त्यामुळे 160 कोटी रुपयांचा मंजूर असलेला निधी वापराविना पडून असल्याचे सांगितले.




ma**************@***il.con