लहान मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात मूलभूत हक्क म्हणून मान्य केलेल्या RTE अधिकारांतर्गत मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकारांतर्गत वंचित दुर्बल आणि सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना इंग्रजी सेमी सीबीएससी किंवा अन्य प्रकारच्या खाजगी व विनाअनुदानित शाळेतील प्रवेशासाठी 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात.
या जागेवरील प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या ऑनलाइन प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्या पाल्यांसाठी नोंदणी करावयाची असून, पालकांनी आपल्या पाल्यासाठी एकाच वेळी विविध दहा शाळांचे पर्याय देणे आवश्यक असते. शिवाय या सर्व शाळा आपल्या निवासस्थानापासून जवळच्या अंतरावर असल्याची खात्री करावी. कारण एकदा अर्ज केल्यानंतर पुन्हा दुसरा अर्ज करता येत नाही. म्हणून या प्रक्रिये अंतर्गत सहभागी होताना पालकांनी जागरूकपणे आपल्या पाल्याचा अर्ज करणे अपेक्षित आहे.
लिंक दिली आहे⬇️
https://student.maharashtra.gov.in
जिल्हा निहाय शाळा आणि प्रवेश क्षमता पुढीलप्रमाणे






