महाराष्ट्र

अवैध धंद्यावर प्रशासनाने फिरवला बुलडोझर

नागरिक समाधानी

नंदुरबार(प्रतिनिधी) पोलिस व पालिकेच्या संयुक्त़ विद्यमानाने करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहीमेच्या कारवाईत येथे अवैध सुरू असलेल्या कुंटणखान्याला बुलडोझरने उद़ध्वस्त़ करण्यात आले.नंदुरबारच्या इतिहासातली ही पहिलीच कारवाई मानली जात आहे.पालिकेच्या हद़दीत तसेच पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करुन या ठिकाणी अनेक वर्षापासून वेश्या व्यवसाय सुरु होता.जिल्हा पोलिस अधिक्षक श्रवण दत्त़ यांनी विविध अवैध धंदे बंद केले होते.तसेच काही दिवस कुंटणखान्याला सिल ठोकून हा धंदा बंद पाडला होता.मात्र, ताकीद देण्यात आल्यानंतरही पुन्हा वेश्या व्यवसाय सुरु झाला होता . गेल्या अनेक दिवसांपासून हा वेश्या व्यवसाय मुळापासून उदध्व़स्त़ करण्याची योजना पोलिसांनी पालिकेच्या मदतीने आखली.अखेर बुलडोझरने कुंटणखान्याशी संबंधित घरे पाडण्यात आली.यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त़ तैनात करण्यात आला होता.

बसस्थानकाला लागूनच असलेल्या पालिकेच्या जागेवर वेश्या व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरु होता.या वर अनेकदा कारवाई करण्यात आली.परंतू हा व्यवसाय कधीच बंद करता आला नाही.या परिसरात समोरच महाराणा प्रतापाचा पुतळा उभारण्यात आला आहे.त्यामुळे महाराणा प्रतापांच्या पुतळयासमोरील वेश्या व्यवसाय बंद करावा,अशी मागणी काही सामाजिक संघटनांनी केली होती.

नंदुरबार जेव्हा तालुक्याचे ठिकाण होते तेव्हा शास्त्री मार्केटजवळील मिरची गल्लीत हा व्यवसाय सुरु होता.या भागात पालिकेचे व्यापारी संकूल बांधण्यात आल्याने या वारंगणांनी आपले बस्थान हलवले..हा कुंटणखाणा एसटी स्टँड शेजारी आला. मात्र शाळकरी मुला,मुलींना या भागातून जातांना ओशाळल्यासारखे व्हायचे.अखेर पोलिसांनी हा परिसर उध्वस्त करण्याचा निर्णय घेतला.त्याला यश देखील आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/