होळीच्या रंगात विष कोणी कालवले..
गदग: रासायनिक रंगांमुळे शाळकरी मुलींना तीव्र आरोग्यदायी समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. आठ शाळकरी मुलींच्या अंगावर विषारी रंग फेकून दुचाकीवरून आलेले टवाळखोर पळून गेले.पोलिसांनी शोध सुरू केला असून त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या टिम शोध घेत आहेत , फॉरेन्सिक तपासणीत हानिकारक रसायनांचा वापर त्या रंगात झाल्याचे उघड झाले आहे.
कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर शहरात होळी साजरी करताना अज्ञात गुन्हेगारांच्या टोळीने आठ शाळकरी मुलींवर रासायनिक रंग फेकल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यानंतर, बस स्टँडवर वाट पाहत असलेल्या पीडित मुलींना छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता.
टवाळखोरांचा एक गट मोटारसायकलवरून आला आणि बसची वाट पाहत थांबलेल्या विद्यार्थिनींच्या अंगावर रंग टाकून टवाळखोरांनी आठ मुलींना लक्ष्य केले, त्यांच्यावर रासायनिक रंग ओतून तेथून पळून गेले.
विद्यार्थिनींवर टाकण्यात आलेल्या रंगांमध्ये विविध प्रकारचे घातक रसायनांचा वापर केल्यामुळे या विद्यार्थिनींना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला मळमळ आणि उलट्या देखील होत होत्या या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.



