सावधान सायबर अरेस्ट मध्ये 2000 कोटींची लूट

सायबर आर्थिक गुन्ह्यामध्ये अलीकडेच वाढलेला प्रकार म्हणजे डिजिटल अरेस्ट या गुन्हेगारी प्रकारात प्रचंड वाढ झालेली असून करोडो रुपयांचा घोटाळा या प्रकारच्या गुन्हे अंतर्गत होत आहे त्यामुळे सरकारने पावले उचलत डिजिटल अरेस्त प्रकरणाशी संबंधित असलेल्या देशातील 87 हजार खाती खात्यावर गृहमंत्रालयाने कार्यवाही केली आहे
भारत सरकारनं डिजिटल अरेस्ट घोटाळ्याशी संबंधित व्हॉट्सॲप आणि स्काईपच्या 87,000 हून अधिक खात्यांवर मोठी कारवाई केली आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरने (आयसी) नं 3,362 स्काईप खाती आणि 83,668 व्हॉट्सॲप खाती ओळखली, जी सायबर घोटाळ्यात सहभागी असल्याचं आढळलं.
गृह राज्यमंत्री संजय बांदी कुमार यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना या कारवाईची माहिती दिली. सायबर गुन्हेगार हे खाते वापरून कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांची दिशाभूल करत होते. लोकांना फसवून पैसे उकळत होते, असं कुमार यांनी सांगितलं. डिजिटल अरेस्ट घोटाळा हा एक वाढता सायबर फसवणूक प्रकार आहे, ज्यामध्ये अनेक लोकांनी गेल्या काही वर्षांत करोडो रुपये गमावले आहेत. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार:
2022 मध्ये डिजिटल अरेस्टशी संबंधित 39,925 प्रकरणे नोंदवली गेली, ज्यात एकूण 91.14 कोटी रुपये लुटले आहे
2023 मध्ये या सायबर फसवणुकीची 60,676 प्रकरणे नोंदवली गेली, ज्यात 339.03 कोटी रुपयांचं नुकसान झालं.
2024 मध्ये डिजिटल अरेस्ट घोटाळ्याची 1,23,672 प्रकरणात 1,935.51 कोटी रुपयांची लूट सायबर गुन्हेगारांनी केली आहे. तर फेब्रुवारी 2025 पर्यंत डिजिटल अरेस्ट घोटाळ्याची 17,718 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यात पीडितांनी 210.21 कोटी रुपये गमावले आहेत.
काय आहे डिजिटल अटक घोटाळा?
डिजिटल अटक घोटाळा हा एक अत्याधुनिक सायबर फसवणूक प्रकार आहे, जिथे घोटाळेबाज पोलीस अधिकारी, सीबीआय एजंट किंवा एनसीबी किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) सारख्या एजन्सीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून लोकांना फसवतात. घोटाळ्याची सुरुवात सहसा पीडितांना व्हॉट्सॲप किंवा स्काईपसारख्या प्लॅटफॉर्मवर वरिष्ठ सरकारी अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचा कॉल, एसएमएस किंवा संदेश आल्यानं होते. कॉल करणारी व्यक्ती पीडित व्यक्तीला मनी लाँड्रिंग, अंमली पदार्थांची तस्करी किंवा ओळख चोरी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचा आरोप करते.
यासंदर्भात सरकारमार्फत अनेक पातळ्यांवर जनजागृतीचे प्रयत्न केले जातात. तरी देखील लोक अशा सूचना मार्गदर्शक तत्वांचा अवलंब न केल्यानेच सायबर अरेस्ट सारख्या प्रकारात बळी पडतात आणि आपली संपत्ती गमावून बसतात. सायबर क्राईम अंतर्गत फसवणूक झालेल्या सर्वच प्रकरणांची सोडवणूक करणे अशक्य असते. त्यामुळे सायबर गुन्हेगारांचे वेगवेगळे फंडे आणि वेगवेगळ्या प्रकारे होत असलेली फसवणूक याविषयी आपण सजग असलो तरच आपले पैसे जाणार नाहीत फसवणूक होणार नाही.



