कायदा श्रेष्ठ की माणुसकी

कधी कधी कायद्यापुढे माणुसकी सुद्धा फिकी पडते ,असे आपल्याला अनेक अनुभव समाजात पाहायला मिळतात. त्यामुळे माणसासाठी कायदे केले आहेत की कायद्यासाठी माणूस आहे अशी शंका येते. कधी कधी कायद्याचा किती अतिरेक होतो आणि मन उद्विग्न बनते. अशा घटनाही घडतात, अशीच एक घटना ओडिसामध्ये घडली असून बहिणीच्या नावावर बँकेत जमा असलेले पैसे काढण्यासाठी आदिवासी व्यक्तीने मृतबहिणीचे हाडे अवशेष बँकेत नेल्यानंतर ओडिशामध्ये त्या व्यक्तीकडे बहिणीची बँकेतील शिल्लक सुपूर्द करण्यात आली.
बहिणीच्या खात्यात जमा असलेले पैसे काढण्यासाठी आदिवासी असलेला भाऊ बँकेत अनेक वेळा चकरा मारल्या बँकेने बहिणीच्या मृत्यूचा पुरावा सादर करण्यास सांगितल्यावर ओडिशाच्या केओंझार जिल्ह्यातील एका आदिवासी व्यक्तीने आपल्या मृत बहिणीच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी मृत्यूचा पुरावा म्हणून तिचे सांगाड्याचे अवशेष बँकेत नेल्यानंतर, तत्परतेने कारवाई केली.बॅक प्रशासनाने एकाच दिवसात सर्व औपचारिकता पूर्ण करून पैसे वितरित केले. केओंझार जिल्ह्यातील पाटणा ब्लॉक अंतर्गत दियानाली गावातील आदिवासी व्यक्ती, जितू मुंडा, सांगाड्याचे अवशेष खांद्यावर घेऊन रस्त्यावरून फिरत असल्याची विचलित करणारी दृश्ये व्हायरल झाली होती, ज्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली होती.
बँकेचे नियम खातेदारांच्या आणि ग्राहकांच्या संदर्भात अतिशय काटेकोरपणे पाळले जातात. हे नियम आर्थिक व्यवहार असल्याने सुलभ व्हावेत हा त्या पाठीमागचा विचार आणि तो तितकाच महत्त्वाचा देखील आहे. परंतु जेव्हा माणुसकीलाही काळीमा फासणाऱ्या अशा घटना घडतात तेव्हा साहजिकच मनाला खंत वाटते कायदे आपल्यासाठी आहेत की आपण कायद्यासाठी आहोत .यात बँकेच्या कर्मचाऱ्यांची ही चूक आहे असे म्हणता येत नाही ,परंतु कायद्यापेक्षा माणुसकी श्रेष्ठ ही बाब लक्षात घेऊन काही गोष्टींची पूर्तता करता येऊन त्या व्यक्तीला तिच्या बहिणीचे बँकेतील शिल्लक देता येऊ शकली असती. कदाचित यावरूनही त्या बँक कर्मचाऱ्याला कायदेशीर अडचणीला तोंडही द्यावे लागू शकले असते. म्हणून अनेक वेळेला मध्यम मार्ग हा अनेकांसाठी सोयीचा ठरतोच पण माणुसकीला काळीमा फासणार नाही याची दक्षता देखिल घेतो.
या बाबत “आम्ही सकाळी मृत्यू प्रमाणपत्र जारी केले. स्थानिक तहसीलदारांनी महसूल निरीक्षकामार्फत कुटुंबाच्या तपशिलाची पडताळणी करून तात्काळ कायदेशीर वारस प्रमाणपत्र जारी केले. त्यानंतर, बँकेच्या अधिकाऱ्यांनी मृत बहिणीच्या कुटुंबीयातील तिघां कुटुंबीयांकडे ₹१९,३०० सुपूर्द केले.



