जिप आणि पस निवडणूका हायब्रिड युतीत

नुकत्याच झाालेल्या मनपा निवडूकांचे निकाल हे तसे पाहता भाजपाला चांगले यश मिळवून देणारे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला आलेले यश् असे आपणास म्हणता येते. मात्र या निवडणूका एका वेगळया अर्थाने देखिल महत्वाच्या ठरतात.निवडणूकीतील समिकरणे बदलत असून आगामी जिप आणि पस निवडणूका आता महायुती किंवा महाविकास आघाडीपेक्षा हायब्रिड युतीत होण्याची शक्यता अधिक आहे.
मनपा निवडणूका प्रत्यक्षात सुरु होण्यापूर्वी कांही ठिकांनी युती तर कांही ठिकांनी भाजपा, दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष स्वतंत्र लढले यामागे जिथे आपण वरचढ तिथे युती नाही ची भाषा वापरत या निवडणूका पार पडल्या. शिवसेनेचे दोन गट पडल्याने दौनही शिवसेना स्वंतत्रय लढल्या असत्या तर निकाल यापेक्षा वेगळे असले असते. भाजपाला मुंबईत शिवसेनेच्या उबाठा गटाशी एकट्याने टक्कर देणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी शिंदेसेनेसोबत युती करत मुंबई ताब्यात घेतली तरी देखिल उबाठा गटाने मुंबईत चांगलींच झुंज दिली असल्याने आजही मुंबई सेनेचीच असे म्हणावे लागेल. मुंबईत शिवसेनेच्या (यूबीटी) कामगिरीत काही ठिकाणी वर्चव्य कायम राहिले आहे. अनेक ठिकांनी शिवसेना उबाठा गटाच्या जागा फार कमी फरकांने गेल्या आहेत. पक्षांतराचे धक्के बसूनही संघटनात्मक वजन असूनही घसरले नाही, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतील काही भागात आपली पकड कायम ठेवली आहे. ठाकरे कुटुंब मराठी अस्मितेवर तसेच भावनिक वृत्तीवर अवलंबून असलेल्या मोहिमेतून सावरत आणि गमावलेली सत्ता परत मिळवण्यासाठी या घटकांचा वापर केला आहे. अशी स्थिती ठाणे आणि कल्याण आणि डोबींवलीत दिसून येत नाही तेथे शिंदेसेना प्रभावी ठरली. हा प्रभाव राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार गटाला पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपात दाखवता आला नाही,
याउलट सत्तेत असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पक्षासाठी मात्र वाईट स्थिती गाढली आहे. त्यांना केवळ जनतेच्या मनात असलेल्या विश्वासघाताकी प्रतिमेशी लढावे लागणार नाही तर त्यांच्या मित्रपक्ष असलेल्या व्यावहारिक उपयुक्तता आणि वर्चस्वशाली भाजपशीही झुंजावे लागले आहे लागणार आहे . त्यामुळे अगामी काळात होवू घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठया घडामोडीची शक्यता नाकारता येत नाही.मुंबईत शिवसेना उबाठाशी युती करून मनसे राज ठाकरेंचा पक्ष लक्षणीय प्रभाव पाडू शकला नाही, मुंबईत फक्त ६ आणि राज्यभरात १३ जागा मनसेने जिंकल्या, ज्यामुळे “किंगमेकर” म्हणून त्यांच्या भविष्यातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याउलट युतीची स्थिती प्रभावी भाजपाने शहरी भागात मारलेली मुंसडी पाहता भाजपा ही महाराष्ट्रात प्राथमिक शक्ती म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. परिणामी शिवसेनेने (यूबीटी) आपले मुख्य शक्ती केंद्र (बीएमसी) गमावल्याने आता २०२९ मध्ये होणाऱ्या निवडणूकीत लढाईचा कठीण सामना करावा लागणर आहे.
महाराष्ट्रात मनसे पेक्षा प्रभावी ठरलेल्या एआयएमआयएम ने छत्रपती संभाजीनगरात (३३ जागा), मालेगाव, नांदेड आणि इतर शहरी भागात 100 पेक्षा अधिक जागा जिंकून लक्षणीय यश मिळवले आहे. काँग्रेसने लातूर हस्तगत करुन चंद्रपूर मध्ये सर्वाधिक नगरसेवक व इतर मनपात देखिल बऱ्यापैकी कामगीरी केल्याने अगामी काळात होवू घातलेल्या जिप आणि पस च्या निवडणूकात होणारी महाविकास आघाडी किंवा महायुती कशी असेल हे निश्चित नाही. कारण काँग्रेसने चांगली कामगीरी करत ३२४ जागा जिकंल्या तर आणि शरद पवार गटाला पराभवाचा मोठा फटका बसल्याने त्यांच्यासाठी या निवडणूका अस्तित्वाची लढाई मानावी लागेल.
काही जिप आणि पस निवडणूका शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकत्रीत लढण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस देखिल एकाकी किंवा वंचितला सोबत घेवून निवडणुकीत उतरेल. ठाकरेंच्या शिवसेनेचा फारसा प्रभाव ग्रामीण भागात नसल्याने त्यांना महाविकास आघाडीत जागा मिळेल की नाही शंका आहे.याबरोबर एआयएमआयएम ने देखील या निवडणुकीत उतरणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी घोषित केले आहे त्यामुळे या निवडणूका महायुती, महाविकास आघाडीत लढल्या जाणार नाहीत तर त्या “हायब्रिड युतीत लढल्या जातील हे मात्र निश्चित.



