FLash

कला व चित्रपट क्षेत्र सर्वांसाठी खुले – पोलीस अधीक्षक अमोल तांबे

तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवल

लातूर : कला व चित्रपट क्षेत्र हे आता केवळ मोजक्यांपुरते मर्यादित न राहता सर्वांसाठी खुले झाले असून, तंत्रज्ञानामुळे प्रत्येकाला आपली प्रतिभा सादर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असे प्रतिपादन लातूरचे पोलीस अधीक्षक IPS श्री. अमोल तांबे यांनी केले.दयानंद शिक्षण संस्था व अभिजात फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दयानंद सभागृहात आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
यावेळी व्यासपीठावर दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव श्री. रमेश बियाणी, शैक्षणिक विकास अधिकारी डॉ. जयप्रकाश दरगड, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, कार्यक्रमाचे प्रायोजक श्री. आदित्य सोनवणे (हॉटेल कन्हैया), उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलसाठी ८ देशांतील २५० शॉर्ट फिल्म्स प्राप्त झाल्या असून, त्यामध्ये शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी, व्हिडिओ साँग आणि ॲनिमेशन प्रकारांचा समावेश आहे. त्यापैकी निवडक १०० फिल्म्स तीन दिवसांत प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या फिल्म्सचे परीक्षण जागतिक दर्जाच्या परीक्षकांनी केले असून, त्यामध्ये सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्री. संतोष पठारे व फिल्म दिग्दर्शक श्री. नीलेश कुंजीर यांचा समावेश आहे. उत्कृष्ट ठरलेल्या फिल्म्सना फेस्टिवलच्या समारोपप्रसंगी पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
gallery pages

स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या फेस्टिवलमध्ये लातूरमधील आठ स्थानिक फिल्ममेकरांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. विश्वास शेंबेकर यांनी अभिजात फिल्म सोसायटीची भूमिका स्पष्ट करत, पुणे व मुंबईप्रमाणे लातूरमध्येही फिल्म संस्कृतीचे वातावरण निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला. मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे म्हणाले की, पूर्वी चित्रपट निर्मिती काही ठराविक कुटुंबांपुरती मर्यादित होती; मात्र आज तंत्रज्ञानामुळे प्रत्येकाला संधी मिळत आहे. समाजातील छोट्या-छोट्या विषयांवर आधारित चित्रपटांद्वारे प्रभावी जनजागृती व समाजप्रबोधन करता येते. सामाजिक व गुन्हेगारी विषयांवरील चित्रपट समाजात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी संस्थाध्यक्ष श्री. लक्ष्मीरमण लाहोटी व सचिव श्री. रमेश बियाणी यांनी फेस्टिवलच्या यशस्वी आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार अभिजात फिल्म सोसायटीचे सचिव डॉ. स्वप्निल देशमुख यांनी मानले.
हा फेस्टिवल अभिजात फिल्म सोसायटीचे अध्यक्ष श्री. जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. स्वप्निल देशमुख,डॉ विश्वास शेंबेकर डॉ स्वप्नील देशमुख, धनंजय कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अभिषेक बुचके, प्रथमेश जाधव, प्रा. शिवशंकर पटवारी, डॉ दुर्गा शर्मा विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून मोलाचे योगदान दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/