FLash

एचएसआरपीला मुदतवाढ

गाड्यांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची मुदत राज्य सरकारने 30 जून2025 पर्यंत वाढवली असून वाहनधारक आता एक एप्रिल ऐवजी 30 जून पर्यंत आपल्या वाहनांना एच एस आर पी प्लेट नंबर प्लेट बसू शकतील. 30 जून नंतर मात्र ज्यांनी आपल्या गाड्यांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवलं नसेल अशांना एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

वाहनांच्या सर्रास होत असलेल्या चोऱ्यांमुळे त्रस्त झालेल्या वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट गाड्यांना बसवणे सरकारने अनिवार्य केले आहे. त्यामुळे चोरीला गेलेली गाडी शोधणे पोलिसांना सहज शक्य होणार आहे. म्हणून सरकारन १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांना एचएसआरपी पाटी बसवण्यासाठी ३ संस्थांची परिवहन विभागाकडून निवड करण्यात आली आहे. यामध्ये सर्व वाहनधारकांना एचएसआरपी पाटी बसवून घ्यावी लागणार आहे. राज्य सरकारने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक अर्थात एचएसआरपी (HSRP) पाटी वाहनांना बसवण्यासाठी मुदत वाढ देण्याचा निर्णय (ता.२१) घेतला आहे. एचएसआरपी पाटी वाहनांना बसवण्यासाठी आता ३० जून २०२५ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ३१ मार्च २०२५ पर्यंत वाहन मालकांनी एचएसआरपी पाटी बसवण्यासाठी मुदत देण्यात आली होती. परंतु पाटी बसवण्यासाठी सुरू असलेलल्या कामाची गती लक्षात घेऊन मुदत वाढ दिली आहे.

१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांना एचएसआरपी पाटी बसवण्यासाठी ३ संस्थांची परिवहन विभागाकडून निवड करण्यात आली आहे. यामध्ये सर्व वाहनधारकांना एचएसआरपी पाटी बसवून घ्यावी लागणार आहे.

केंद्र सरकारने वाहनांची सुरक्षा आणि ओळख निश्चित करण्यासाठी एचएसआरपी पाटी अनिवार्य केली आहे. एचएसआरपी पाटीमध्ये युनिक सिरीयल क्रमांक आहे. त्यामुळे पाटी चोरी रोखता येते. तसेच वाहनांचं ट्रेकिंग करता येतं.
एचएसआरपी क्रमांक पाटीसाठी परिवहन विभागाने अधिकृत नोंदणी कंपन्यांकडे नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. त्याची माहिती वाहनधारकांना वाहन पोर्टलवर मिळते. तसेच मोटर वाहन कायदा १९८८च्या सेक्शन १७७ नुसार अनधिकृत पाटी वापणाऱ्यांवर १ हजार रुपयांचा दंड आकरण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/