FLash

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान जाहीर

भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना मॉरिशस च्या वतीने दिला जाणारा सर्वोच्च सन्मान द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन हा पुरस्कार आज जाहीर करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर आतापर्यंत 21 देशांकडून सर्वोच्च सन्मान बहाल करण्यात आले आहेत मॉरिशस कडून देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान भारतातील आतापर्यंत नरेंद्र मोदी यांनाच तो प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी एका कार्यक्रमात केली भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे दोन दिवसाच्या मोरीसिस दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात त्यांनी मॉरिशसचे राष्ट्रपती धरमवीर गोकुल यांची देखील भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी मॉरिशसच्या राष्ट्रपतींना पवित्र गंगाजल आणि त्यांच्या पत्नीसाठी रेशमी बनारसी शालू साडी व इतर वस्तू भेट म्हणून प्रदान केल्या.
यावेळी बोलताना त्यांनी भारत आणि मॉरिशसमधील खोलवर रुजलेल्या संबंधांचे पंतप्रधानांनी कौतुक केले; दोन्ही राष्ट्रांमधील व्यापक संबंधांची रूपरेषा सांगितली. या पुढील कालावधीत दोन्ही देश एकमेकांच्या सहकार्याने विकासाला पूरक आणि प्रेरक ठरतील असेही सुतवाच केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/