प्रयत्न एकत्रितच, मात्र अमेरिकेच्या पुढाकारने- तुलसी गॅबार्ड

अमेरिका प्रथम म्हणजे एकटी अमेरिका नाही’ भारत आणि अमेरिका एकत्रितरित्या जे प्रयत्न करत आहेत त्यात अमेरिकेचा पुढाकार असा खुलासा रायसीना डायलॉगमध्ये, तुलसी गॅबार्ड यांनी केला, पुढे त्या म्हणाल्या की अमेरिका भारतासोबतचे संबंध मजबूत करण्याचा विचार करत आहे.
ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन (ORF) आणि परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केलेल्या रायसीना डायलॉग या परिषदेत बोलताना , गॅबार्ड बोलत होत्या. यावेळी त्या भारतीय आधिकाऱ्यांना देखील भेटल्या होत्या. “तुमच्या स्वतःच्या सुरक्षा हितसंबंधांबद्दल तुम्हाला असलेल्या गंभीर चिंते बद्दल त्यांच्याकडून थेट ऐकले”, आणि “अमेरिका प्रथम ही एकटी अमेरिका नाही तर भारताला सोबत घेऊन पुढे जाण्यासाठी एकत्रित येऊन प्रयत्न केले जातील असे होय. ” हे अधोरेखित केले.
वेगाने विकसित होणाऱ्या सायबर सुरक्षेची गरज, अस्तित्वात असलेल्या सुरक्षा आणि आपले सुरक्षा हितसंबंध बळकट करण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि एआय आणि इतर क्षमतांचा जास्तीत जास्त वापर करण्यावर लक्ष केंद्रित केल्याशिवाय आपल्यासमोरील आव्हाने आणि संधी या दोन्हींबद्दल चर्चा करणे अशक्य आहे.”असेही त्यांनी सांगितले.
ट्रम्प यांच्या दृष्टिकोनाचे स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या, “अमेरिकेत, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प वास्तववाद, व्यावहारिकतेवर आधारित धोरणाद्वारे शांतता प्राप्त करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवर अढळ आहेत,जगात शांतता सुरक्षितता प्रस्थापित करणे, ज्याबद्दल ते अनेकदा बोलतात, त्यासाठी अस्तित्वात असलेल्या जागतिक आव्हानांची तसेच संधींची स्पष्ट आणि वास्तववादी समज असलेले मजबूत नेते आहेत.”
रशिया-युक्रेन युद्ध किंवा गाझामधील युद्धाबद्दल ट्रम्पच्या दृष्टिकोनाचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या, “संघर्ष वाढण्याची शक्यता कमी करणारे सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध वाढवण्याची वचनबद्धता आणि आपल्या परस्पर हितसंबंधांना बळकटी देण्याच्या समर्पणाची आवश्यकता आहे, त्यासाठी नेत्यांमध्ये मित्र आणि विरोधक दोघांशीही थेट संवाद साधण्याचे, समजूतदारपणा वाढवण्याचे, मतभेद सोडवण्याचे आणि संघर्ष वाढू नये म्हणून काम करण्याचे धाडस असणे आवश्यक आहे.”
त्यांनी केलेल्या या सर्व विधानावरून अमेरिका जागतिक राजकारणात पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित करू इच्छिते आणि म्हणूनच ट्रम्प यांनी इजराइल गाजा पट्टी आणि रशिया युक्रेन युद्धात तोडगा काढण्याचे विविध मार्गी प्रयत्न सुरू केल्याचे आपण पाहू शकतो भारत अमेरिका संबंध निश्चितच आगामी कालखंडात अधिक दृढ होतील यात शंका वाटत नाही शिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्लादिमीर पुतीन यांच्याशी साधलेला संवाद हा देखील कुठेतरी आंतरराष्ट्रीय राजकारणातील नवी नांदी ठरेल की काय आणि चीनला प्रत्यक्ष दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न होईल काय हे आगामी काळात पाहायला मिळेल.



