FLash
शिवकुमार स्वामी यांना मातृशोक

कमळाबाई वीरुपाक्षप्पा स्वामी यांचे वर्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज सिद्धेश्वर मंदिर परिसरातील लिंगायत स्मशान भूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्या अकोल्याचे आयुक्त दिलीप वीरुपाक्षप्पा स्वामी तथा बीडचे उपजिल्हाधिकारी शिवकुमार विरुपाक्षप्पा स्वामी यांच्या आई होत्या.
त्यांनी सुरुवातीच्या कालखंडात तोंडार येथे बालवाडी शिक्षिका म्हणून आनंददायी शिक्षण देत मुलांना संस्कारीत करत अनेक पिढ्या घडविल्या होत्या.



